या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ९० ) झाल्यावर व वडील व गुरु आपआपल्या आसनांवर बसल्यावर मग बाण सेवकानें मांडलेल्या आसनावर बसला. नंतर बाणानें आपल्या घरीं चालत असलेल्या वेदशास्त्राध्ययनाची चौकशी केली. तो ह्मणाला, आपल्या येथें चालत असलेले यज्ञ, याग योग्यरीतीनें पूर्वीप्रमाणे चालत आहेतना ? शिप्यमंडळी यथाकालीं नीटरीतीनें अध्ययन करीत आहेना ? पूर्वीप्रमाणेच वेदाभ्यास एकसारखा चालू आहेना ? पूर्वोत्तरपक्षयुक्त व्याकरण|ध्ययन_तसेंच चाललें आहेना ? तशीच न्यायशास्त्राची चर्चा एकसारखी चालू आहेना ? इतर शास्त्राध्ययनाची अभिरुचि ज्यानें मंद केली आहे असा मीमांसाशास्त्रा- विषयीं निर्भर पूर्वीसारखाच चालू आहेना ? अमृतस्राव करणान्या सुभाषित काव्यादिकांचा अभ्यासहि पूर्वीसारखाच चालला आहेना ?" यावर पूर्वीप्रमाणेच सर्व गोष्टी यथास्थित चालू असल्याचें गुरूंनी सांगि तलें. त्यावेळी बाण हा लोकापवादांतून मुक्त होऊन हर्षराजाने त्याचा यथा- योग्य सन्मान केला ह्मणून सर्वांनी मोठा आनंद व्यक्त केला. बाणाच्या येथे चालत असलेल्या शास्त्राध्ययनावरून व त्याच्या ग्रंथां- वरून त्यानें त्यांत प्रसंगानें अनेक शास्त्रांचें व त्यावेळी प्रचारांत असलेल्या सांख्य, वैशेषिक, बौद्ध, जैन, चार्वाक इत्यादि अनेक पंथांच्या तत्त्वांचे उपमालंकारांत वगैरे उल्लेख केले आहेत. यांवरून व त्याने आपल्या पूर्वजा दिकांस लावलेल्या विशेषणावरून वाणाचे पूर्वज, बंधू व वाण हे अनेक शास्त्रपारंगत असल्याचें ध्यानांत येण्यासारखे आहे. बाणाचे कांहीं ग्रंथ नष्ट झाले आहेत, तरी हल्ली उपलब्ध असलेल्या त्याच्या ग्रंथांवरून देखील तो असाधारण विद्वान् व कवि होता यांत कांहीं संशय नाहीं. · भवभूति व वाक्पतिराज. ● भवभूतिकवीचाहि काल याच शतकांत असल्याबद्दल विद्वेज्जनांनी ठर- विले आहे. वाणकवीनें हर्षचरितांत कवींच्या नामावलींत येण्यासारखें त्याचें नांव असून ज्याअर्थी आलें नाहीं, त्या अर्थी सातव्या शतकाच्या उत्तरार्धीत झणजे बाणकवीनंतर भवभूति हा झाला असावा. हर्षराजाच्या नंतर कनोज- च्या राज्यासनावर बसलेल्या यशोवर्मराजाच्या पदरीं हा होता. यावरून हि याचा कालनिर्णय करता येतो. १ डॉ० भांडारकर यानी राजतरंगिणीच्या आधारें हा काल ठरविला आहे.