या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ९१ ) भवभूति हा वैदर्भ (वन्हाड ) देशचा राहणारा होता. तथापि तो विद्वज्जनांस आश्रय देणान्या कान्यकुब्जदेशाच्या राजांपैकी यशोवर्मराजा- च्या पदरीं होता. याबद्दल राजतरंगिणींत आधार आहे. तो असाः- कविर्वाक्पतिराजश्रीभवभूत्यादिसेवितः- जितो ययौ यशोवर्मा तद्गुणस्तुतिबंदिताम् || " 66 राजतरंगिणीं- तरंग ४ - श्लोक १४४ - वाक्पतिराज व भवभूति यांनीं सेविलेला, ललितादित्यानें जिंकिलेला कवि यशोवर्मा हा ललितादित्याचें वर्णन करणारा झाला ! कित्येकांनी 'कविवाक्पतिराज' इ. असा पाठ करून कवि याचा संबंध वाक्पतिराज व भवभूति यांजकडे लाविला आहे. परंतु तो ठीक नाहीं. पंडित दुर्गाप्रसाद यांनी अनेक जुन्या प्रतीवरून छापलेल्या राजतरंगिणींत 'कविर्वाक्पति ' इ. असाच पाठ ठेवला आहे व हाच युक्त आहे. ' कवि ' याचा संबंध यशोवर्मा याजकडे असल्याने 'तद्गुणस्तुतिबंदिताम् ' या पदाकडेहि चांगलें स्वारस्य येतें ! तो कवि असल्याबद्दल मुक्तिमुक्तावलींत त्याच्या नांवावर असलेली पद्येहि साक्ष देत आहेत. त्यांपैकी एक पद्य जिज्ञासूंकरितां पुढे दिले आहे:- -

  • “यत्वन्नेत्रसमानकांति सलिले मग्नं तदिदीवरम् ।

मेघैरंतरितः प्रिये तव मुखच्छायानुकारी शशी । येऽपि त्वगमनानुसारिगतयस्ते राजहंसा गताः । त्वत्सादृश्यविनोदमात्रमपि मे दैवेन न क्षम्यते ! ॥” राजपुत्रयशोवर्मणः वाक्पतिराज यानें 'गौडवध' नांवाचें काव्य प्राकृत भाषेत केले आहे. त्यांत त्यानें आपला आश्रयदाता ' यशोवर्मा याच्या पराक्रमाचे वर्णन करून त्यानें गौड राजाचा वध केल्याबद्दल वर्णन केले आहे. हा वाक्पति व भवभूति हे दोघे राजकवि यशोवर्म्याचे पदरी असून दोघेहि मित्र होते. वाक्पतिराज यानें भवभूतीपासून पल्याला पुष्कळ उपयोग झाल्याचें झटले आहे. भवभूति कवि हा तासच आहे व करुणरस असा भवभूतीनेंच वर्णन करावा, याविषयीं ‘कारुण्यं भवभूतिरेव तनुते' हे वचन प्रसिद्धच आहे.

  • अप्पयदीक्षितांनीं प्रतीक हैं एक उदाहरण घेतले आहे,