या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ९२ ) परंतु दुसरेंहि एका कवीचें भवभूतीच्या संबंधानें प्रसिद्ध नसलेलें पद्य खुबी- दार आढळल्यावरून तं पुढें दिलं आहे. 6 ' रत्नावलीपूर्वकमन्यदास्तामसीमभोगस्य वचोमयस्य । पयोधरस्येव हिमाद्विजायाः परं विभूषा भवभूतिरेव || ' याचें तात्पर्य असें कीं संस्कृतवाङ्मयाला रत्नावली वगैरे काव्यांनी शोभा असली तरी भवभूतीचीं काव्यें ह्रींच अलंकारभूत आहेत. भवभूतीचीं शृंगार- वीर-करुणरसप्रधान-नाटकें - मालतीमाधव, उत्तररामचरित व महावीर- चरित, हीं सर्वत्र प्रसिद्धच आहेत. वरील कवितेंत कवीनें खुबीदार श्लेषालं - कार साधला आहे ! या ग्रंथांतील महत्त्वाच्या गोष्टीबद्दल विचार. मालव, गौड - गुप्त हा कोण? प्रतापवर्धन वारल्याचें एकतांच मालवराजानें ग्रहवर्म्यास द्वेषानें मारिलें, आणि कनोज घेऊन तेथेंच राज्यश्रीस बांदशाळेत टाकले. यावरून कनोज हें ग्रहवर्म्याच्या राहण्याचें व गादीचें स्थान होतं, असें उघड झाले. बाणकवीर्न याबद्दल हर्षचरित्रांत कोठें कांहींच स्पष्ट उल्लेख केलेला नाहीं ! मालवराजानें ग्रहवयिस मारल्यावर कनोजचें राज्य घेतलें, परंतु पुढे राज्यवर्धनाने स्वारी करून मालवाचा नाश केल्यावर गौड - गुप्त शशांक यानें विश्वासघातानें राज्यवर्धनास फसवून मारल्यावर गुप्तानें कनोज घेऊन तेथें आपल्यापैकी गुप्तसरदार नेमला असावा. यास हर्ष- चरित्रांत कुलपुत्रगुप्त अर्सेहि ह्मटले आहे. तो कुलीन असल्यामुळे त्यानें राजश्रीस अनाथ अबला समजून बंदीशाळेतून सोडून दिलें, असें दिसतें. मालवराजांपैकी एका पक्षाचें व हर्षाच्या घराण्याचें हाडवैर पूर्वापार चालत आलें होतें, असें बाणकवीनें प्रभाकरवर्धनास 'मालवलक्ष्मी- लतापरभु ' असें विशेषण दिले आहे यावरून उघड होते. प्रभाकरवर्धन १ हेलानिर्जित मालवानीकमपि गौडाधिपेन मिथ्योपचारोपचितविश्वासं मुक्तशस्त्र- मेकाकिनं विश्रब्धं स्वभवन एव भ्रातरं व्यापादितमश्रोषीत् | ६० उ० ६ पान २०८ २ देव, देवभूयं गते राज्यवर्धने गुतनाम्ना च गृहीते कुशस्थले इ० ह० उ० ७ ३ कान्यकुब्जाद्गौडसंभ्रमं गुप्तितो गुप्तनाम्ना कुलपुत्रेण निष्कासनं निर्गतायाश्च राज्य- वर्धनमरणश्रवणं श्रुत्वा चाहारनिराकरणमनाहारहातायाश्चविंध्याटवी पर्यटनखेदं जात- निर्वेदायाःपाव कप्रवेशोपक्रमणं यावत्सर्वमाणोद्वयतिकरं परिजनतः ६०उ०८ पा ० २८१.