या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ९४ ) तेव्हां ' राज्यवर्धनानें मालवराज ( देवगुप्त ) यास तेव्हांच शासन केले, परंतु गौडानें विश्वास दाखवून राज्यवर्धनास मारिलें ! असे सांगून भंडीनें पायांत बिड्या ठोकलेले (संयत ) मालवराजाचे लोक वगैरे हर्पास दाखविले. ह्या हर्षचरितांतील वर्णनाशी वरील पद्यांतील मजकुराचा बराच मेळ जुळतो, असे चाणाक्ष वाचकांच्या ध्यानांत येण्याजोगे आहे. हुएनसँग यानें गौडास कर्ण सुवर्णपुरचा राजा व शशांक असें ह्मटलें आहे, परंतु बाणकवीनें यास जागजागीं 'गौड' असेंच ह्मणून या गुप्ताचें नांव गुप्तच ठेवलें आहे ! ' मालव ' गौड याचा प्रत्यक्ष नामनिर्देश बाणानें केला नाहीं यावरून 4. • आत्मनाम गुरोर्नाम नामातिकृपणस्यच | श्रेयस्कामो न गृह्णीयाज्ज्येष्ठापत्यकलत्रयोः || या धर्मशास्त्रांतील वचनांत अतिकृपण ह्यणजे नीच याचें नामग्रहण करूं नये असे असल्यामुळे त्यानें तें केले नाहीं कीं काय कोण जाणे ! हर्षा- नेहि गौडाच्या संबंधानें 'नामापि गृहतोऽस्य पापकारिणः पापमलेन लिप्यत इव मे जिव्हा । ह्या पाप्याचें ( गौडाचें ) नामग्रहण केलें असतां पापमल माझ्या जिभेला बिलगून राहील !' असे तिटकान्यानें झटलें आहे. हा गौडराजा विरुद्ध पक्षापैकी एक पुढारी होता. हा पूर्वेकडील राजा होता, असे वाण व हुएनसँग यांच्या वर्णनांत आले आहे. गौडाच्या अपराधामुळेच काय पूर्वदिशा काळीठिक्कर पडली ! ' गौडापराधशंकिनीव श्यामतां प्रपेदे दिकू माची' असें बाणाने संध्याकाळच्या वर्णनांत खुबीनें ध्वनित केलें आहे. या वाक्यांतील 'गौड' शब्दाप्रमाणेच जागजागीं ' गौड' 'गौड ' असे त्यानें निर्देश केले आहेत ! तथापि श्लेषप्रिय आपल्या कवीच्या वर्णनाच्या भरांत श्लेषामध्ये एके ठिकाणी शशांक पद खुबीनें पडून गेले आहे. हूणास जिंकून पितृमरणानंतर राज्यवर्धन परत घरीं आला त्यावेळचे पुढील वर्णन आहे. "देवोऽपि हर्षस्तथैव स्नात्वा धरणितलनिहितकुथाम सारितमूर्तिरदूर एवास्य तूष्णीमेव समवातिष्ठत | दृष्ट्वा दृष्ट्वा दूयमानमानसमग्रजन्मानं समस्फुटदिवास्य सहस्रधा हृद यम् । औरसदर्शनं हि यौवनं शोकस्य | लोकस्य तु नर- पतिमरणदिवसादपि दारुणः स बभूव दिवसः । सर्वस्सि- .