या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ९६ ) ,

  • विहग कुरु दृढं मनः स्वयं, त्यज शुचमास्व विवेकवर्त्मनि ।

सह कमलसरोजिनीश्रिया श्रयति सुमेरुाशरो विरोचनः । तच्चाकर्ण्य वानिमित्तज्ञः पितरि सुतरां जीविताशां शिथिलीचकार । ही गृहकमलिनीपालाची चक्रवाकपक्ष्यास उद्देशून उक्ति आहे. ती प्रस्तु- तांकुरालंकारांत आहे. " सूर्यकमलिनी श्रीसह अस्तास चालला आहे, या करितां मन घट्ट कर, शोक सोड, व विचार कर ! हे ऐकून हर्ष पित्याच्या जीविताशेविषयीं निराश झाला ! " असे वर्णन आहे ! यांत कमलिनीपाला- नें चक्रवाक पक्ष्यास संबोधून जरी झटले आहे, तरी हर्षास त्याच्या जननी सह त्याचा पिता परलोकास चालल्याचें सूचक वर्णन केले आहे. विरोचन (सूर्य) शब्दानें येथे प्रतापी प्रतापवर्धन याचेंहि ग्रहण केले आहे, हे कोणा- च्याहि सहज लक्षांत येण्यासारखे आहे. यावरून पूर्वी दाखल केलेल्या उता- न्यांत सूर्यवाचक शब्दानें प्रतापवर्धन वगैरे घेण्यास कांहीं हरकत वाटत नाहीं. . सेनापति सिंहनाद याच्या उपदेशांत पुढील श्लेषोक्ति आहे. तीवरून प्रतापवर्धन व गौड ( शशांक ) यांचें पूर्वापासून हाडवैर होतें असें लक्षांत येतें. देव देवभुयं गते नरेन्द्रे दुष्टगौडभुजङ्गजग्धजीविते च राज्यवर्धने वृत्तेऽस्मिन्महाप्रलये धरणीधारणायाधुना त्वं शेषः । समाश्वासय अशरणाःमजाः । क्षमापतीनां शिरःसु शरत्सवितेव ललाटंतपान्प्रयच्छ पादन्यासान् ' इ० । यांत नरेन्द्र ( प्रतापवर्धन, विषवैद्य) परलोकवासी झाल्यामुळे दुष्ट गौडभुजंगाने ( शशांकानें ) राज्यवर्धनाला ग्रासून टाकल्यामुळे पृथ्वी धारण करण्यास तूंच शेष ( शेपसर्प व अवशिष्ट ) आहेस! असे सिंहनादाने श्लेषोक्तीनें हाटलें आहे. यावरून त्या वेळी प्रतापवर्धनापुढें गौडादिकांचें कांहीं चालत नव्हतें व तो वारल्याबरोबर राज्यवर्धन व हर्ष यांस अल्प-

  • आपल्या कवीचे ग्रंथ हे शब्दार्थालंकारांनी भरलेले भांडार असल्याचें प्रायः

सर्वोस माहीत आहेच. त्यानें या ठिकाण प्रस्तुतांकुरालंकार घालून एका प्रस्तुत गोष्टीवरून दुसरी प्रस्तुत गोष्ट लक्षांत यावी, अशी योजना केली आहे. 6 यत्र प्रस्तुतेन वर्ण्यमानेनाभिमतमन्यत्प्रस्तुतं द्योत्यते तत्र प्रस्तुतांकुरः या अलंकाराचें लक्षण सांगितले आहे. , १ । असें