या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ९९ ) . हर्षचरितांत तर अगदी शेवटीं हर्षानें दिवाकरमित्रास झटलें आई, ‘ मीं क्रोधाधीन होऊन कपटानें बंधूचा घात करणान्या वैन्याचा नाश कर ण्याकरितां प्रतिज्ञा केली आहे, ती पुरी होईपर्यंत आपण कृपा करून मज बरोबर राहून माझ्या बिचाया बहिणीचें धर्मकथांनीं व उपदेशपर भाषणांनीं सांत्वन करावें ' अशी त्याची प्रार्थना करून त्यासह तो आपलें सैन्य गंगा- तीरीं तळ देऊन राहिलें होतें तिकडे गेला. बाणकवि हा पहिल्यानें हर्षाकडे गेला तेव्हां तो गंगा उतरून 'मणि- तार ' नांवाच्या ठिकाणाजवळ हर्षराजाच्या सैन्याचा तळ पडला होता, तेथे त्यास भेटावयास गेला. तेथें हजारों हत्ति, घोडे व सैनिक यांनीं गजबजलेल्या त्या ठिकाणीं शेंकडों मांडलिक राजांनी सेवा केलेल्या "दर्शनाश या दिवस नयद्भि- र्भुजनिर्जितैः शत्रुसामंतैः संमतादासेव्यमानम्" अशा हर्षराजाला बाणा- ने पाहिले. यावरून मुख्य छावणी गंगेच्या कांठीं ठेवून शत्रूवर स्वान्या करून तो त्या ठिकाणी परत येत असे, असे दिसतें. वाणकवीनें हर्षाचें चरित्र त्याची भेट होण्याच्या पूर्वी जें घडून आलें तितकेंच वर्णिलेलें आहे असे वाटतें. बाकी त्याच्या मनांत हा ग्रंथ मोठा करावयाचा होता यांत संशय नाहीं. हर्षचरिताची येथपर्यंत अशा रीतीनें समाप्ति झाली असल्यामुळे, व गौडवघसंबंधाचें बाणाचें वर्णन नसल्यामुळे वाचकांची जिज्ञासा तशीच अतृप्त राहिली ! हर्षानें तर 'मी थोड्या दिवसांतच गौडरहित पृथ्वी कर णार नाही तर प्रज्वलित अमींत उडी टाकीन' अशी दुर्धर प्रतिज्ञा केली असल्याचे वर्णन आहे. १ - 'एपिग्राफिआ इंडिका ( Vol. VI P. 143 ) यांत शीलोद्भव घराण्यांतील महाराजाधिराज - शशांक याचा मांडलिक महासामंत माधवराज याच्या वंशजानें अग्रहार दिल्याबद्दल ताम्रपटांतील आहे. त्यांत " ओम् स्वस्ति लेख छापला चतुरुदधिसलिलवीचिमेखला. वर्ष. निलीनायां सद्वीपगिरिषत्तनवत्यां वसुंधरायां गौप्ताब्दे शतत्रये वर्तमाने महाराजश्रीशशांकराजे शासति इ० असे झटले आहे. गोप्ताद ३०० झणजे इ० स० ६१९ होतात. ह्यावर्षी शशांकराजा १यदि परिगणितैरेव वासरैः * निगौंडां न करोमि मेदिनीं ततस्तनूनपाति पीतरु- पिंषि पतंग इव पातकी पातयाम्यात्मानम् (पान २१७).