या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१००) जिवंत असून राज्य करीत होता असे उघड होतें. आतां राज्यवर्धन ह्याचा मृत्यु ( युरोपियनांच्या ह्मणण्याप्रमाणे ) इ० स० ६०६ मध्ये घडून आला व त्याच किंवा पुढच्या वर्षी हर्षानें राज्यसूत्रे हाती घेतली. ह्यावरून ह्या दानपत्राचे वेळेस हर्षाच्या प्रतिज्ञेस तेरा वर्षांचा काल लोटला होता. ह्यावरून हर्षानें केलेली प्रतिज्ञा त्याचे हातून तडीस गेली नाहीं, असें वाटणे साहजिक आहे. परंतु ती शेवटास गेल्याखेरीज राहिली नसावी. आतां शशांक हा दांतीं तृण धरून हर्षास शरण आल्यामुळे त्यानें त्यास जीवदान दिले अस- ल्यास न कळे ! कारण 'अत्र शेषभोगिमण्डलस्योपरि क्षमा कृता' यांतील द्वयर्थात कांहीं राजांवर त्यानें क्षमा केली, असें हर्षचरितांत आहे. हर्षानें स्ववधोद्यत मनुष्यावर देखील दया केल्याबद्दल हुएनसँगच्या लेखांत वर्णन आहे. ह्यावरून 'वज्रादपि कठोराणि मृदुनि कुसुमादपि । लोकोत्तराणां चेतांसि कोहि विज्ञातुमर्हति ॥ ' वज्राहून कठोर व फुलाहून मृदुल अशीं थोरांची मनें असतात ! तेव्हां काय सांगावें ? कदाचित् असाहि प्रकार घडला असल्यास देव जाणे ! हुएनसँगच्या लेखांत हर्षानें पश्चिमेपासून पूर्वेपर्यंत जे उन्मत्त राजे होते त्यांनां जिंकून आपल्या ताब्यांत आणलें, असें ह्मटले आहे. ह्यामुळे व आपल्या बंधूचा घात करणाऱ्या गौडाचा सूड उगविण्या. चाच हर्षाचा मुख्य उद्देश असल्यामुळे आणि त्याकरितांच तो प्रतिज्ञा करून प्रचंड सैन्यासह बाहेर पडला असल्याकारणानें त्यानें गौडास अगदी 'त्राहि त्राहि करून सोडले असावेंच अर्से अगदी उघड दिसतें! हुएनसँगच्या लेखाप्रमाणे हर्षाचें तीस पस्तीस वर्षेपर्यंत जर राजे जिंकण्याचें व देश काबीज कर- ण्याचे काम चालले होते तर मुख्य शत्रुच त्याचे हातून अचानक कसा सुटेल? स्मिथच्या इतिहासांत इ० स० ६१९ पर्यंत शैशांकराजानें टिकाव धरला. परंतु पुढे त्याचे राज्य हर्षाने घेतलं असावें असे आहे. या ह्मणण्यास त्यानें ह्या शिलालेखाचाच आधार दिला आहे व रंगापति नांवाची त्याची राजधानी होती, ती मुर्शिदाबादेच्या दक्षिणेस बारा मैलांवर होती असेंहि ह्मटलें आहे. बाणानें हर्पराजाचे " भुजनिर्जितैः शत्रुसामंतैः समंतादासेव्यमा- 66 १हा शशांकराजा शैव असून बौद्धधर्माचा तिरस्कार करणारा होता. याने बौद्धगया येथील प्राचीन बोधि [ पिंपळाचा वृक्ष ] समूल खणून टाकला व पाटलीपुत्र येथील बुद्धाच्या पादुका फोडून टाकल्या. पुढे अशोकाच्या वंशांतला मगधदेशचा राजा पूरणवर्मा याने बोधिवृक्षाचें त्याठिकाणी पुनः नवीन आरोपण केलें.