या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रस्तावना.

 हा बाणभट्टावरील निबंध त्याच्या ग्रंथांत आढळून आलेल्या कांहीं प्रमाणभूत गोष्टी, चिनी प्रवाशांचे लेख, शिलालेख, ताम्रपट इत्यादिकां च्या आधाराने लिहिला आहे. अशा प्रकारचे निबंध मराठी भाषेत अद्यापि झालेले नाहीत, असें बन्याच विद्वानांचें मत आहे. कै. विष्णु कृष्ण चिपळूणकर यांनी कालिदासादि कविपंचकावर व दुसऱ्यानहिि अनेक विषयां- वर मराठीत निबंध लिहिले आहेत. ते त्यांची चतुरस्र विचारसरणी व चटकदार भाषापद्धति यांनी मंडित आहेत, यांत कांहीं संशय नाही. तथापि ते निबंध त्या त्या कवींच्या पुस्तकांतील कवित्वदर्शक कांही गोष्टी व निबंध- काराचे त्यासंबंधाचे विचारतरंग, यांनींच प्राय: भरलेले आहेत. त्यांत ऐति- हासिक गोष्टी वगैरेकडे विशेष लक्ष दिले असल्याचे आढळून येत नाहीं. बाणभट्टावरचा त्यांचा निबंध तर त्यांनी हर्षचरित देखील न वाचतां लिहिला आहे ! तथापि त्या पूर्वी व त्या वेळीं दुसन्या कोणांकडून असे निबंध फारसे न झाल्यामुळे त्यांच्या निबंधास खरोखरीच अत्यंत महत्त्व देणे आवश्यक आहे. बाणभट्टावरचा निबंध त्यांनी लिहिला, त्या वेळीं तितकी साधनें उपलब्ध नसल्यामुळे तो जसा व्हावा तसा झाला नाहीं हें मात्र खचित होय ! तथापि त्यांचा निबंध बन्यापैकी आहे, असे आपण गृहीत केले तरी जसे आंब्याचे निरनिराळे बंछोड, हपूस, पायरी इत्यादिकांचे मासले कोणास हे नकोसे होत नाहीत; तर ते सर्व रसनेंद्रियास रुचणारे व आवडणारेच आहेत! त्याप्रमाणे एकाद्या विषयावर एकादें पुस्तक असून दुसरीहि आणखी बरी पुस्तकें झालीं तरी, तीं देखील रसिक विद्वज्ज नांच्या आदरास पात्र झाल्याखेरीज राहत नाहींत.
 कांही दिवसांपूर्वी हर्षचरित व कादंबरी यांतील अमृतरसास्वाद घेत असतां, उच्च प्रतीच्या विद्यालयांत व परीक्षेत ह्या थोर कवीचे 'हर्षचरित' व 'कादं- बरी ' हे उत्तम ग्रंथ चालू असतांहि आमच्या विद्वानांपैकी कोणाकडून ह्या कवीच्या संबंधानें इंग्रजीत किंवा मराठीत यथास्थित विवेचन कसें झालें नाहीं ? झणून मनास मोठें नवल वाटलें | व अशा कविवर्याची आपल्या-