या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १०३ ) अर्से झणणे बरोबर होणार नाहीं. कदाचित् तसेंच प्रमाण मिळून खरोखरीच हे वैश्य राजे होते अर्से निश्चितपणे ठरल्यास राजपुतान्यांतील रजपूतराजे व दिल्लीचे यवनराजे यांचे जसे शरीरसंबंध घडले, त्याप्रमाणें हाहि प्रकार घडला, अर्से मानावें लागेल ! परंतु इतक्या प्रमाणास रद्द करणारी सबळ प्रमाणे आढळतील असे वाटत नाहीं ! हुएनसंग यानें प्रतापवर्धन, राज्यवर्धन व हर्ष या तिघांनीं कनोजेचें राज्य केलें, व या तिघांसहि कनोजचे राजे अर्से सटलें आहे. परंतु हर्ष. चरितावरून या तिघांच्या वेळेस दिल्लीजवळ सरस्वती नदीच्या कांठी स्थाने- श्वर येथेंच यांची गादी होती. हर्षाची आई ही तिचा पति असन्नमरण झाला असतां स्थानेश्वर येथील सरस्वती नदीवरच अग्निप्रवेश करण्याकरितां चालत गेली व त्याचे बापासहि तेथंच दहन करण्यास नेलें. इत्यादि गोष्टींवरून या तिघांचे राज्यासन स्थानेश्वर येथेंच होतं. राज्यवर्धनाच्या मृत्यूनंतर पुढे बऱ्याच वर्षानी हर्षानें राजे जिंकून राज्य- विस्तार केल्यावर कनोज येथें राजधानीचें ठिकाण केले असावें. यावरून हुएन सँगवर्णित सर्वगोष्टी अगदी बिनचूक आहेत असेंच मानणे बरोबर वाटत नाही ! भंडीच्या संबंधाने बाण व हुएनसँग यांच्या वर्णनांत विरोध. हर्षचरितांत राज्यवर्धनाचा खून केल्याचें वर्तमान हर्षास समजतांच त्यास फार दुःख व संताप झाला आहे. तेव्हां सिंहनादनामक सेनापति जवळ होता त्यानें हर्षाचें समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे, व त्याच्या अंगी वीरश्री चढण्यासारखे माषण करून शत्रूंचा नाश करण्याकरितां त्याला उत्तेजन दिलें आहे. तेव्हां त्याचें भाषण हर्षास मान्य होऊन तो लागलींच युद्ध करण्यास निघाला आहे. हूएनसँगचे चरित्रांत 'भानी ' हा मुख्य प्रधान होता असे आहे. राज्यवर्धनाचा शत्रूनें घात केल्यावर भानीनें सभा • शर्मा देवश्च विप्रस्य वर्मा लाता च भूभुजः भूतिर्दत्तश्च वैश्यस्य दासः शूद्रस्य कारयेत् ॥ यमस्मृतिः 'I १ मि० जुलेन यानें हुएनसंगच्या पुस्तकाच्या केलेल्या भाषांतरांत असा मजकूर आहे. २ हल्ली या प्रदेशास पंजाब इलाखा ह्मणतात.