या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १०६ ) , 66 असताना प्रधानादिक मुत्सद्दी त्याच्या नांवानेंच राज्यकारभार चालवीत असतील, हे उघडच आहे. परंतु त्याच्या मागें हर्षास गादीवर बसविण्याच्या खटपटी चालू होत्या. हें तर अगदींच चुकीचें आहे व हर्ष इ. स. ६०५ च्या अक्टोबरांतच गादीवर बसला यासहि आधार म्हणून दिले आहेत, ते अनुमानानेंच जुळविलेले असावे असे दिसतें. वडील बंधूच्या पश्चात् आपणास राज्यावर बसविण्याविषयीं चाललेल्या खटपटी हर्षास पसंत असत्या तर त्यानें वडील बंधु लौकर घरी येण्याकरितां त्याजकडे घाईनें स्वारे पाठविले होते, ते पाठविले नसते. राज्यवर्धन शत्रूस जिंकून घरी परत आल्यावर पितृविरहानें विरक्त होऊन हातांतील शस्त्र टाकून देऊन "हें राज्य तूं संभाळ, मी तप करण्याकरितां वनांत जाणार ! " अर्से सांगून तो तयार झाला आहे. ती त्याची आज्ञा ऐकून हर्षास मोठा अचंबा वाटला आहे व फार दुःख झाले आहे. त्यानें आपल्या मनांत अनेक तर्क करून शेवटीं प्रियबंधूची राज्य चालविण्याविषयींची आज्ञा मला योग्य वाटत नाहीं, याकरितां आपणहि ह्याच मार्गास अनुसरावें असा निश्चय केला. राज्यवर्धनाच्या मागें राज्य मिळण्याच्या खटपटी हर्षास मान्य असत्या तर तो राज्य सोडून भावाच्या मागोमाग अरण्यांत जाण्यास सिद्ध झाला नसता ! यासंबंधानें हर्षचरितांतील लेख वाचला असतां उभय बंधूं- च्या संवादांतील खरें भ्रातृप्रेम कळून येऊन हुएनसँग, स्मिथ वगैरेंचें ह्मणणें सर्वथैव खोटें, अशी खात्री झाल्यावांचून राहणार नाहीं ! 6 तत्र च त्वरमाणो भ्रानुरागमनार्थमुपर्युपरि क्षिप्रपातिनो दीर्घाध्वगान्प्रजविन- श्चोष्ट्र्पालान्प्राहिणोत् ' ह. च. उ. ५ पान १७८. २ २ अथ तच्छ्रुत्वा निशितशिखेन झूलेनेवाहतः प्रविदीर्णहृदयो देवो हर्षः सम- चिंतयत् | ह. च. उ. ६. ३ अपिचार्ये तपोवनं गते जिजीविषुः को हि नाम महीं मनसा पिध्यायेत् । x x किंवा ममानेन वृथा बहुधा विकल्पितेन | तूष्णीमेवार्यमनुगमिष्यामि | गुरुवचनाति- क्रमकृतंच किल्बिपमेतत्तपोवने तप एवापास्यति इत्यवधार्य प्रथमतरं गतस्तपोवन- मधोमुखस्तूष्णीमेवातिष्ठत | ह. च. उ. ६. हर्षचरित उच्छ्वास ६ या ठिकाणचे अशा प्रकारचे दुसरे मागचे पुढचे हर्षांचे तर्क वितर्क व मनांतील खरे उद्गार पाहिले असतां याविषयीं खात्री झाल्यावांचून राहणार नाहीं.