या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १०७ ) वयाच्या संबंधाने बाण व डॉ. हाल, स्मिथ इ. यांच्यांत मतभेद. इसवी सन ६३७ त हुएनसँगची व हर्षाची भेट झाल्यावर आज तीस वर्षे हर्ष लढाया करीत आहे, असे त्यानें ह्मटले आहे. वरील सनांत तीस वजा केले असतां ६०७ हा हर्षाचा शककाल ठरविण्यांत आला आहे. हुएनसँग हा इ. स. ६३९ ६४०त नालंद येथील बौद्धमठांत असतांना त्याला कोणी भविष्यवाद्यानें सांगितले होते की शिलादित्य ( हर्ष ) राजा हा सुमारें १० वर्षांनी मरणार आहे, व त्याप्रमाणे गोष्ट घडून आल्यावरून सुमारें ६४८ - ५०हा त्याचा अंतकाल ठरविण्यांत आला आहे. इ. स. ६०७त हर्ष गादीवर बसला व त्या वेळेस त्याचें वय १ ५वर्षांचे असल्याबद्दल व्हिन्सेन्ट स्मिथ वगैरेच्या इतिहासांत आहे, परंतु यांत चूक असावी असे वाटतें. हर्षचरितांत चवथ्या उच्छ्रासांत हर्षाचा जन्मकाल दिला आहे. परंतु त्यावरून बरोबर काल समजणे अशक्य आहे. ज्येष्ठ वद्य द्वादशीस प्रदोष कालानंतर कृत्तिका नक्षत्रावर हर्ष जन्मला, त्या वेळी सर्व ग्रह उच्चीचे होते. याप्रमाणें सर्व उच्चीचे ग्रह मांधात्याच्या जन्मकाळीं मात्र होते असे तारक नांवाच्या विद्वान् ज्योतिप्यानें प्रभाकरवर्धनास सांगितले आहे. परंतु सर्वच ग्रह एके काली उच्चीचे येत नसतात, असे ज्योतिः शास्त्रज्ञ ह्मणतात. उच्चीचे झणजे शुभ असा अर्थ असेल तर कोण जाणे! बाणानें दिलेल्या वर्णनावरून त्याचा नक्की काल समजणें कठिण आहे. यांत एखाद्या शकाचा निर्देश असता तर या कालाचा माग काढण्यास ठीक झालें असतें. परंतु तसें यांत नाहीं. मग राज्यश्रीच्या वेळेस राणी यशोवती गरोदर असतां राज्यवर्धनास सहावें वर्ष चालू होतें. व हर्ष दाईचीं बोर्ट धरून पांचसहा पावले टाकूं लागला होता, ह्मणजे सुमारे वर्षादडिवर्षाचा असावा, व राज्यवर्धन हर्षापेक्षां पांचवर्षांनीं वडील होता. राज्यश्रीच्या जन्माच्या वेळेसचे यशोवतीच्या १' मृगपतिपात इव रक्षिपुरुषशस्त्रपंजरमध्यगते, धात्री करांगुलीलग्ने, पञ्चपाणि पदानि प्रयच्छति हर्षे, षष्ठं वर्षमवतरतिच राज्यवर्धने, देवी यशोवती गर्भेणाधत्त नारायणमूर्तिरिव वसुधां देवीं राज्यश्रियम् । , २ सर्वभूभृदभ्यर्थितां गौरीमिव मेना ( यशोवती ) प्रसूतवती दुहितरम् | अस्मिन्नेव तु काले देव्या यशोवत्या भ्राता सुत मष्टवर्षदेशीय मुद्भूयमानकुटिल