या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ११० ) , १८वर्षीचा असल्याचें तेथें झटलें आहे, व त्याला हर्षानें 'सख्या रसायना, ' असें ह्मटलें आहे. यावरून तो हर्षाचा समानवयस्कच असावा, व हर्षहि यावेळेस सुमारें त्याच्या इतक्या वयाचाच असावा. बाप वारल्यावर पुढे राज्यवर्धन हा हूणांस जिंकून परत आल्यावर पितृदुःखाने व्याकुळ असतां एकाएकी भगिनीभर्ता गृहवर्मा यास शत्रूनें मारिल्याचें वर्तमान आलें. तेव्हां पहिलें दुःख एकीकडे ठेवून तो मोठ्या क्रोधानें व आवेशाने मालव- राजावर चालून गेला, व तिकडे त्याचा विश्वासघातानें वध झाला. तेव्हां पुढें हर्ष गादीवर बसण्याचा योग आला असला पाहिजे. यावेळी हर्षाचें वय सुमारें १९ वर्षांचें तरी असले पाहिजे. यावरून हॉल, स्मिथ, वगैरे युरोपियनांचे वयाच्या संबंधाचे तर्क व प्रमाणे बरोबर आहेत वाटत नाहीं ! हर्ष गादीवर बसला तेव्हां १५ वर्षांचा होता असे स्मिथचें ह्मणणें आहे. राज्यवर्धन हूणांवर चालून गेला तेव्हां तो “ कवचहर " ह्मणजे वयांत आलेला – ह्मणजे २१ वर्षीचा होता असें हॉलच्या ह्मणण्यावरून स्मिथनें ठरविले आहे. परंतु हर्षचरितावरून पाहतां राज्यवर्धन हूणांवर जाण्या- पूर्वीच दोघे बंधु तारुण्यांत आल्याचें वर्णन आहे. त्यांत राज्यवर्धन २३ वर्षीचा तरी असावा. याविषयीं मागें विवेचन केलेंच आहे. पुढें तो 'कवच- हर' ह्मणजे कवच धारण करणारा - पूर्ण तारुण्यांत आलेला युद्ध करण्यास समर्थ - झाला आहे. अर्से त्याच्या बापास वाटल्यावरून त्याने त्याला हूणां- बरोबर युद्ध करण्यास पाठविले. यावेळी राज्यवर्धन २४ वर्षीचा व हर्ष १९ वर्षांचा तरी असला पाहिजे असे लक्षांत येतें. " —— 1 - तेव्हां राज्यवर्धन २१ वर्षांचा व हर्ष १५ वर्षांचा असावा, या- विषयीं हॉल व स्मिथ साहेब या दोघांचाहि तर्क व प्रमाणे चुकीची असावीं असें ध्यानांत येतं ! बौद्धधर्माचा वैदिक धर्माशीं एकजीव आणि बाण व हुएनसँग यांपैकीं निःपक्षपाती कोण ? दिवाकरमित्र हा ब्राह्मण व राज्यवर्धन व हर्ष हे राजे होते. त्यांनीं वद्विज्ञाता व्याधिस्वरूपाणां रसायनोनाम वैद्यकुमारः सास्रस्तूष्णीमधोमुखोऽभूत् । पृष्टश्च राजसूनुना - " सखे रसायन, कथय तथ्यं यद्यसाध्विव पश्यसि " इति । सोऽ- ब्रवीत् - " देव श्वःप्रभाते यथावस्थितमावेदयितास्मि इति ।