या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२)

कडून कांहीं सेवा झाली तर करावी, असें मनांत आल्यावरून हर्षचरित वाचून त्यांतील कांहीं मुख्य गोष्टींची टिप्पणे करून ठेवली. हूएनस्यांग याच्या पुस्तकांतहि बाणाचा आश्रयदाता श्रीहर्पराजा याच्या संबंधाची बरीच माहिती असल्याबद्दल समजल्यामुळे त्याच्या पुस्तकांच्या इंग्रजी भाषांतराचे दोन्ही भाग वाचावयास मिळविले व त्यांतील महत्त्वाच्या मुद्यांचेहि उतारे करून घेतले. तशीच आणखी दुसऱ्या कांहीं इंग्रजी पुस्तकांत उपयुक्त माहिती आढळली तिचाहि संग्रह केला. शिवाय शार्ङ्गधराची सुभाषितपद्धति, जल्हण - देवाची सूक्तिमुक्तावलि, वल्लभदेवाची सुभाषितावाले इत्यादि अनेक संस्कृत ग्रंथांत प्रकृतविषयोपयोगी कांहीं पदे आढळलीं, त्यांचाहि संग्रह केला व फुरसतीप्रमाणे निबंध लिहिण्याचा क्रम सुरू ठेवला.
 हा निबंघ लिहीत असतां ग्रंथिक तापानें मनुष्यहानि झाल्यामुळे व वर्षास बाहेर गांवीं चार चार पांच पांच महिने जावें लागल्यामुळे वगैरे कार- णांनी हा पुरा होण्यास बरेच दिवस लागले. पुढे हा निबंध बहुतेक तयार झाल्यावर तदभिज्ञ विद्वज्जनांस तो कसा काय वाटतो हे पहावें, असें मनांत आलें. कारण, " आपरितोषाद्विदुषां न साधु मन्ये प्रयोगविज्ञानम् | बलवदपि शिक्षितानामात्मन्यमत्ययं चेतः " असे कविकुलगुरूचे सुद्धां जर उद्गार आहेत, तर मग मजसारख्या अल्पज्ञ मंदमतीची ती कथा किती ! नंतर हा निबंध - अशा प्रकारच्याहि विषयांत निष्णात असलेले डॉ० भांडा- रकर, प्रो. काथवटे, प्रो. पाठक व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांस दाखविला. त्यांस हा बराच पसंत पडला तेव्हां मनास बरेंच धैर्य आल्यासारखें होऊन याजकडे अधिक लक्ष देण्यास हुरूप वाटून हा तयार केला आणि छापून प्रसिद्ध करण्यास उमेद वाटली. पुढे याचें छापण्याचें काम सुरू असतांनां कोठें काही उपयुक्त अल्पस्वल्प माहिती आढळली, तीहि यांत सामील केली. हर्षचरिताखेरीज इतर सर्व साधनें- चिनी प्रवा शांच्या लेखांची भाषांतरें, इंडियन ऍटिकेरीचीं पुस्तकें, शिलालेख, ताम्रपट, संस्कृत पुस्तकें वगैरे – येथें फक्त डॉ० भांडारकर यांचे येथे मात्र उपलब्ध असल्यानें, व तीहि त्यांचे येथे तेथले तेथें मात्र पहावयास मिळाली असल्यानें, जरी ग्रंथकारानें जेथल्या तेथें मजकूर येण्याविषयीं आपल्याकडून खबरदारी घेतली आहे, तथापि यांत कदाचित् कोठें कमी- जास्त व पुढेमागें मजकूर झाला असल्यास विद्वज्जन त्याजकडे करडी नजर - . .