या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ११३ ) हुएनसँगच्या लेखांत ब्राह्मणांनीं हर्षास मारण्याकरितां मारेकरी तयार केला. व त्यामुळे ५०० ब्राह्मणांस हर्षानें हद्दपार केले वगैरे गोष्टी आहेत; परंतु त्या विश्वासार्ह वाटत नाहींत. तसें असतें तर बाण, मयूर इत्यादि ब्राह्मण- कवींनां त्याने इतके अंतरंग व विश्वासपात्र केले नसतें. आतां बाणाच्या ग्रंथांतहि अद्भुत वर्णने आहेत; परंतु ती कविसंप्रदायास अनुसरून आहेत. त्यांत कोणाच्या निंदा नाहींत. बाण हा हर्षाच्यांच देशांत व त्याचेच पदरीं असल्यामुळें, व त्याचा स्वभाव दुराग्रही नसल्यामुळे त्याचे लेख जितके विश्वासार्ह वाटतात, तितके हुएनसँगचे वाटत नाहीत. हुएनसँग यानें ह्या देशांत बौद्धयात्रा करीत असतां जी टिप्पणे करून ठेविली होती, त्या- वरून त्याच्या शिष्यांनीं मागून त्याच्या टिप्पणांत अधिकउणा मजकूर घालून त्यांस चिनीभाषेंत ग्रंथांचे स्वरूप देण्यांत आलें. पुढे त्या ग्रंथांच्या आधा- रानें फ्रेंच, जर्मन, व इंग्लिश भाषेत त्यांची भाषांतरे झाली! त्यांतहि अधिक उणा प्रकार झाला असेलच. अशी अनेक रूपांतरे होत गेल्यामुळे या ग्रंथां तून कांहीं ठिकाणीं चुका होण्याचा संभव आहे, व त्याप्रमाणे कांहीं चुका मार्गे दाखविल्याहि आहेत. बाणाच्या ग्रंथाचीं तशीं रूपान्तरें झाली नस- ल्यामुळे त्यांतील गोष्टी अधिक विश्वासार्ह वाटतात. , यशोवर्मा, ललितादित्य, पराक्रमाच्या चळवळी व देशाचें स्वरूप. हर्षाचे मृत्यूनंतर कनोजची राज्यक्रांति होऊन तेथील गादी मौखरीवंश कडे गेली असावी, असे गौडवघकाव्याच्या प्रस्तावनेत रा.ब. शंकर पांडुरंग पंडित यांनी झटलें आहे व त्यास ज० कनिंगह्याम ह्याच्या लेखाचाहि तेथें आधार दिला आहे. हर्षाच्या पश्चात् त्याची धाकटी बहीण राजश्री ही राहिली असावी व कनोजची गादी राजश्रीच्या झणजे- मौखरीघराण्याच्या ता- ब्यांत गेली असावी; किंवा इतकी क्लिष्टकल्पना करण्यापेक्षां मूळची कनोज येथील गादी मौखरीघराण्याचीच होती ती बलाढ्य हर्षाचे पश्चात् त्या घरा- ण्याकडे पुनः गेली असावी, हेंच ठीक दिसतें ! - हर्षानंतर सातव्या शतकाच्या उत्तरार्धीत यशोवर्मा हा कनोज येथील राज्यासनावर बसला. हा ग्रहवर्म्याचा जवळचा बांधव असावा. यशोवर्मा हा चंद्रवंशांतला होता असें वाक्पतिकवीनें गौडवघकाव्यांत झटले आहे. यशोवर्म्यानें गौडप्रमुखराजे जिंकून पराक्रमाची कृत्यें केलीं तीं गौडवध- १ हे काव्य प्राकृत भाषेत आहे. त्या भाषेत यास 'गौडवहो' असें नांव आहे.