या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १२० ) शोक करूं नकोस. कोणत्या पुण्यप्रदेशाचे ठायीं तुला राहण्यास आवडतें तें सांग, ह्मणजे त्या ठिकाणी आपण जाऊं " ती ह्मणाली, " भूलोकाची माहिती तुला आहे, याकरितां, कोणतें स्थान आपल्यास राहण्यास योग्य असेल त्या ठिकाणी जाण्याचे करूं " मग ब्रह्मदेवास नमस्कार करून व सर्वांस विचारून पुसून ती सावित्रीबरोबर निघाली. आकाशांतून उतरत असतां ज्याच्या तटावर वृक्षादिकांची फारच शोमा आहे व ज्याचा स्वच्छ प्रवाह फारच मनोहर वाहतो आहे अशा ' हिरण्यवाहु ' ( याला शोण असेहि ह्मणतात ) नदास पाहून “ हें स्थळ मला आवडतें !" असें सरस्वती म्हणाली. तेव्हां शोणनदाच्या पश्चिमतीररावर उतरून व एक सुंदर लतामंडप पाहून तेथें त्या दोघीजणी राहिल्या. तेथें असतां झ डांची फुले तोडावीं, शोणनदावर स्नान करावें, स्वतः स्थापन केलेल्या वालुकामय शिव- लिंगाचें पूजन करावें व कंदमूल फलें भक्षण करून शोणनदाचें मधुर उदक प्राशन करावें, याप्रमाणे त्या कालक्रमणा करीत असत. एके दिवशीं प्रहरदिवसाचे सुमारास उत्तरदिशेकडून कांहीं गलबला सरस्वतीचे कानी आला. तेव्हां ती तिकडे पाहू लागली तो घोड्यांचें खिका. ळणें तिच्या कानीं पडलें व धुळीचा लोटहि तिचे दृष्टीस पडला. तेव्हां ती कौतुकाने तिकडे पाहत उभी राहिली असतां, ज्याच्याबरोबर पायदळ व घोडेस्वार आहेत असा, ज्याच्या दोन्ही बाजूंस दोन सेवक चौन्या वारीत आहेत असा, दृष्टीस आनंद देणारा व दुसरा केवल मदनच, असा आठ- रा वर्षांचा तरुण पुरुष घोड्यावर बसून येत आहे, व त्याचेबरोबर वृद्ध परंतु शरीराने बळकट व नम्र असा दुसरा एक पुरुष आहे, असे तिच्या दृष्टीस पडलें. त्याच वेळेस त्या तरुण पुरुषास त्याच्या सेवकांकडून या ठिकाणी दोन सुंदर कन्या राहतात, असे समजलें. तेव्हां त्यास मोठें कौतुक वाहून तो ज्या ठिकाणी त्या राहत होत्या, त्या ठिकाणी जाण्याकरितां घोड्यावरून उतरला व सेवकांस दूर राहण्यास सांगून आपल्याबरोबर त्या वृद्ध मनुष्यास घेऊन फार नम्रतेनें तो त्या ठिकाणी गेला. तेव्हां त्या दोघींनीं स्यास पल्लवासन बसावयास देऊन त्याचें आदरातिथ्य केलें. मग सावित्री त्या वृद्धपुरुषास ह्मणाली " कुलीन स्त्रियांनी परपुरुषाची विचारपूस करणे हें मर्यादेस सोडून आहे खरें, तथापि हा दिव्यपुरुष कोण ? हें ऐकण्याविषयीं आमांस फारच उत्कंठा वाटत आहे ! "