या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १२१ ) , तो ह्मणाला, हा तरुणपुरुष, महामुनि च्यवन याचा- शर्यातिराजाची कन्या सुकन्या इजपासून झालेला पुत्र होय. हा भृगुवंशाचा तिलक व च्यवनऋषीचा जीव की प्राण आहे! ह्याचे नांव दधीच सुकन्या गरोदर असतां तिचे दिवस भरत आले तेव्हां तिचे बापाने तिला आपले घरीं आणिलें. तेथें ती प्रसूत होऊन तिला हा पुत्र झाला. पुढें कांहीं दिवस गेल्यावर शर्यातीनें सुकन्येस आपले पतीचे घरी पोहचतें केलें व आपले • नातवास परमस्नेहानें आपलेपाशी ठेवून घेऊन त्यास अनेक विद्यांत प्रवीण केलें. सांप्रत हा तारुण्यांत आल्यामुळे याच्या पितरांस पुत्रसुखाचा अनुभव मिळावा, ह्मणून यास त्यांजकडे पाठविले आहे !" नंतर त्याने आपलीहि थोडी हकीकत सांगितली. तो ह्मणाला " राजा शर्याति याचा मी सेवक आहे. माझे नांव विकुक्षी. मला राजानें यांच्या ( दधीचाच्या ) सेवेस अर्पिलें आहे. यांस च्यवनऋषीच्या आश्रमीं पोहोचविण्याची मला धन्याची आज्ञा आहे. च्यवनाचा आश्रम शोणनदाच्या पलीकडे जवळच आहे. " नंतर विकुक्षीनें सावित्रीस आपण कोण, कोठून आलां, येथें राहण्याचे प्रयोजन काय ? हे सांगण्याची विनंति केली. परंतु सावित्रीनें “आमचा वृत्तांत पुढे कधी कळून येईल. आपण कांहीं काल येथें घालविण्याचें करावें. सहवासानें सेह वाढतो " असें झटले. मग दधीच विकुक्षीस ह्मणाला, " आणखी कधीं सांगण्याची कृपा करतील. ऊठ आतां, पित्याच्या भेटीस जाऊं " मग ते त्यांस विचारून घोड्यावर बसून चालते झाले. त्या दिवसापासून सरस्वती व दधीच या दोघांचें प्रेम एकमेकांवर जडलें. सरस्वतीस तर तो दृष्टीस पडल्यापासून अगदीं चैन पडेनासे झाले. पुढे विकुक्षी परत जात असतां त्या ठिकाणी येऊन त्या दोघींस ह्मणाला, " दधीचास तुमचा विसर पडला नाहीं. त्याची स्वतःची अवस्था तुझांस कळविण्याकरितां मालती नांवाच्या दासीस तो तुझांकडे लवकरच पाठविणार आहे " असे सांगून तो गेला. दुसरे दिवशीं मालती त्या ठिकाणी आली. • मग सावित्री शोणनदावर स्नानास गेल्यावर तिनें सरस्वतीस दधीचा- ची अवस्था सांगितली. तेव्हां ती ह्मणाली, 'मी सर्वस्वी आपले प्राण दधीचास अर्पण केले आहेत, यांत काय ते समजावें !" मग तिचा हेतु जाणून मालती लागलींच दधीचाकडे गेली. आणि तिची अवस्था सांगून त्यास तेथें घेऊन आली. ते दोघे एकांतसुख भोगीत असतां कांहीं काळानें