या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १२२ ) सरस्वतीस पुत्र झाला. तेव्हां तिनें त्यास " सर्व विद्यांचें ज्ञान तुला प्राप्त होईल.' असा वर दिला. पुढें ब्रह्मदेवाच्या आज्ञेप्रमाणें सरस्वती सावित्री- सह स्वर्गलोकास गेली. तेव्हां दधीचास तिच्या विरहाचे असह्य दुःख होऊन तो अत्यंत विरक्त झाला. नंतर त्यानें आपली भावजय अक्षमाला ईस आपल्या मुलाचें पालनपोषण करण्यास सांगून तो तप करण्याकरितां वनांत गेला. ज्या दिवशीं सरस्वतीस पुत्र झाला, त्याच दिवशीं अक्षमाले- सहि पुत्र झाला. सरस्वतीच्या पुत्राचें नांव 'सारस्वत ' व अक्षमालेच्या पुत्राचें नांव ' वत्स ' असें ठेविलं होतें. अक्षमालेने दोघां मुलांचेंहि सम- भावानें लालनपालन केलें. सारस्वत यानें वत्सास मातेच्या कृपेनें आपणास अवगत झालेल्या सर्व विद्या शिकवून त्यास 'प्रीतिकूट' या गांवीं ठेवून आपण तप करण्यास गेला. हा वत्स पुढे एका मोठ्या वंशाचा आदिपुरुष झाला, व याच वात्स्यायन कुलांत बाणकवि उत्पन्न झाला. अशी कथा हर्षचरितांतील वात्स्यायनवंशवर्णन नांवाच्या प्रथमोच्छ्रासांत आहे. बाणांचा निपणजा कुबेर हा वेदविद्येत मोठा प्रवीण होता. गुप्तवंशां- तील राजे त्याचा मोठा सन्मान ठेवीत असत. त्याला चार पुत्र होते. त्यांत पाशुपत नांवाचा एक पुत्र होता, तो फारच विद्वान् होता. हा बाणाचा पणजा होय. याचा पुत्र अर्थपति हाहि मोठा विद्वान् होता. यानें पुष्कळ शिष्य तयार केले व यज्ञयागादि कर्मे करून मोठो कीर्ति संपादिली. अर्थपतीस भृगुप्रमुख अकरा पुत्र होते, त्यांत चित्रभानु हा विद्येच्या तेजानें प्रतिसूर्या- सारखा होता. त्याला बाण हा पुत्र झाला. बाणाच्या आईचें नांव राज्य- देवी असें होतं. ती तो लहान असतांच वारली. यामुळे त्याच्या बापास त्यांचे संगोपन करावे लागले. त्याचा बापहि त्याचे वयाचे चवदावे वर्षी वारला. शोणनदीचे पश्चिमेस प्रीतिकूट या गांवीं वाणाचें राहणें असे. बाण हा लहानपणी स्वच्छंदी होता, असे त्याच्या चरित्रावरून दिसतें ! त्याचे आईबाप लहानपणीच निवर्तले होते यामुळे व पुढे त्याच्या अंगी विद्या व तारुण्य यांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे त्याच्या स्वच्छंदवृत्तीस अधिकच उत्तेजन मिळून त्याने आपल्या आप्तमित्रांसह देशाटन केले. प्रथम तो मोठमोठ्यांच्या उपहासास पात्र झाला. परंतु पुढें विद्वान् गुरूंच्या सह- वासानें व मोठमोठ्या राजदरबारी फिरून आल्यानें तो मोठमोठ्या राजांच्या हि " सन्मानास पात्र झाला. . . .