या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२३ ) नं. पं. वाचनालय, केदिवशी बाण आपल्या आप्तमित्रांसह बसला असतां बाणाचा 1 JAN 199

बांधव चन्द्रसेन येऊन म्हणाला, 'हर्षराजाचा बंधु कृष्णराज याजकडून दूत आला आहे. ' तो म्हणाला, त्याला लवकर घेऊन ये. , मग दूत दृष्टीस पडतांच बाण व्यास म्हणाला, अकारणबंधु कृष्णराज खुशाल आहे ना? त्यानें ‘ होय ' म्हणून व नमन करून एक पत्र बाणास दिलें. तें पाहतां, ' उशीर न करतां लवकर निघून यावें, इतर गोष्टी मेखलकतोंडी सांगतां कळून येतील.' असें त्यांत होतें. मग त्यानें सेवकादिकांस दूर करून मेख- लकास तोंडी निरोप विचारला. तो म्हणाला, " स्नेह होण्यास कुल, शील वय इत्यादि पुष्कळ कारणे लागतात. परंतु तुमची माझी भेट नसतांहि तुमचे विषयी माझे मनांत प्रेम उत्पन्न झाले आहे ! आतां तुमचा उत्कर्ष सहन न करणाऱ्या दुर्जनांनी महाराजांच्या मनांत भलतेंच भरवून दिलें आहे. तथापि मला सर्व खरें समजलें आहे. ह्मणून राजाजवळ तुमच्या भेटीची गोष्ट काढून लहान वयांत प्रायः सर्वांकडून प्रमोद घडतात असे सांगीतले. ही गोष्ट महाराजासहि कबूल आहे. हा राजा इतर राजासारखा नाहीं, हा फार थोर व गुणग्राही आहे. याकरितां व्यर्थ घरांत बसून न राहतां लवकर येण्याचें करावें. राजाकडे येण्यास मनांत कांहीं भीति बाळगावयास नको ! हे ऐकल्यावर बाणानें चंद्रसेनास मेखलकाची भोजनाची वगैरे सर्व व्यवस्था ठेवण्यास सांगितलें. संध्याकाल झाला तेव्हां बाण शोजनदावर संध्या करून आपल्या शय्येवर जाऊन पडला आणि चिंतन करूं लागला. तो झणाला, राजाचा तर मजविषयीं भलताच ग्रह झाला आहे. अकारणबंधु कृष्णराज यानें तर मला फारच अगत्यानें बोलावले आहे. तेथे माझा कोणाशी परिचय नाहीं,व विद्येचें मोटेसें कौतुकहि नाही. तथापि कृष्णरायाच्या लेखास मान देऊन अवश्य जाण्याचे करावें. भगवान् शंकर सर्व यथास्थित करील ! " असें ह्मणून त्याने जाण्याचा निश्चय केला. मग बाणानें मोठ्या पहाटेसच उठून स्नान-संध्यादि कर्मे केली व मंगलकारक सूक्ते ह्मणून व शंकराचें परम भक्तीनें अभिषेकपूर्वक पूजन करून ब्राह्मणांस दानधर्म केला. त्याची आत मालती इनें गमनकाली ह्याचे प्रयाणमंगल करून बाणास शुभप्रद आशीर्वाद दिले. मग बाण कुलदेवतांनां नमस्कार करून प्रीतिकूट गांवापासून निघाला, तो चंडिकावनाचें आक्रमण करून मल्लकूट या गावी गेला. तेथें बाणाचा परममित्र जगत्पति यानें त्याचे चांगले आदरातिथ्य 66 6