या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १२४ ) केलें. दुसरे दिवशीं भागीरथी उतरून तो यष्टिगृहक नांवाच्या गांवीं जाऊन राहिला. मग तेथून मांडलिकराजे हत्ती, घोडे, पायदळ, इत्यादिकांनी गज- बजून गेलेली अशीं अजिरवतीनदीच्या काठी ' माणतार ' नांवाच्या ठिकाणाजवळ हर्षरराजाची छावणी होती तेथें तो गेला. नंतर स्नानोपाहारादि कर्मों आटोपून मेखलकाबरोबर - हर्षराजाच्या भेटीकरितां आलेल्या मांडलिक राजांचे हत्ती, घोडे, वगैरेंची आणि दुसरी अनेक प्रकारची शोभा व चम- त्कार पाहत पाहत तो चालला. 66 तेथील असंख्य हस्त्यश्वादि प्राणी पाहिल्यावर बाणाच्या मनांत आलें, ब्रह्मदेवाने इतके प्राणी उत्पन्न केले असतां पंचमहाभूतांचा क्षय कसा झाला नाहीं ! या प्रकारें अचंबा करीत तो चालला असतां पुढें राजद्वारापाशीं येतांच द्वारपालांनी मेखलकास ओळखिलें. मग ' क्षणमात्र आपण येथेंच बसावें ' असें बाणास सांगून मेखलक आंत गेला, आणि एका पुरुषासमा- गर्मे येऊन ह्मणाला हा महाराजाचा मुख्य द्वारपाल पारियात्र होय. " मग तो पुढे होऊन बाणास नमन करून ह्मणाला –" चला, महाराज संतोषानें आपली भेट घेण्यास तयार आहेत ! ' ते ऐकून बाणास मोठा आनंद वाटला. मग त्याजबरोबर निघून वाटेनें अश्वशालेतील सुंदर अश्व पहात पहात चालला असतां पुढे मोठ्या पर्वताएवढा हर्षराजाचा बसावयाचा हत्ती त्याचे दृष्टीस पडला. तेव्हां तो द्वारपालास ह्मणाला ' कांहीं प्रतिबंध नसल्यास हा गजेंद्र पाहण्याचें मला मोठे कौतुक वाटतें आहे !' ' पाहण्यास काय प्रतिबंध आहे ? ' अर्से ह्मणून द्वारपालाने त्यास तो गजेंद्र दाखविला. बाणाने बराच वेळ त्याची मौज पाहिल्यावर द्वारपाल वाणास ह्मणाला, ' आणाखी कधीं हा गजेंद्र फिरून पाहतां येईल, आतां अगोदर महाराजां- च्या भेटीस चलावें. ' मग वाण तेथून निघून ज्याठिकाणी हर्षराजा इतर राजपुत्रांसह बसला होता त्या ठिकाणी गेला. हर्षास पाहिल्यावर बाणास मोठा आनंद झाला. तेव्हां बाणकवि आल्याचें द्वारपालानें राजास कळविलें. वाणानेंहि राजास आशीर्वाद केला. प्रथमतः हर्पानें त्याजविषयीं आपली अनादरबुद्धि दाख- विल्यासारखें केले. तेव्हां वाण राजाकडे पाहून धैर्यानें ह्मणाला? 'दुसन्याच्या सांगण्यावरून अज्ञान्याप्रमाणे मजविषयीं भलतीच शंका धरूं नये. प्रत्यक्ष अनुभव घेऊन पहावा' इत्यादि त्याचे भाषण ऐकल्यावर हर्पराजानें प्रसन्नतेचेंच चिन्ह दाखवून सूर्यास्ताची वेळ झाली ह्मणून तो उठून गेला. , ,