या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १२५ ) तेव्हां बाणहि आपल्या बिन्हाडीं गेला. तो आपल्या मनांत ह्मणाला, हर्ष- राजा उदार स्वभावाचा खरा ! जरी लोकांच्या सांगण्यावरून त्याचा मज- विषयीं वाईट ग्रह झाला होता, तथापि सांप्रत त्याचे मजवर प्रेम दिसून आलें. धिक्कार असो मला कीं, मी असल्या गुणवान् व दयाळू राजाविषयी भलतीच कल्पना मनांत आणली होती ! तर आतां राजास माझी पूर्ण योग्यता कळून येईल अर्से मी करीन. पुढें लवकरच राजास बाणकवीची योग्यता कळून येऊन त्यानें त्याचें उत्तम प्रकारें आदरातिथ्य केलें व द्रव्या- दिक देऊन मोठा सन्मान केला. बाणकवि हा कांहीं दिवस हर्षराजाजवळ राहिला. पुढे शरहतूचे दिवस आले तेव्हां तो आपले आप्तमित्रांस भेटण्याकरितां आपले गांवीं गेला. हर्षराजानें बाणाचा मोठा सन्मान केल्यामुळे त्याच्या आप्तांस त्याची फार धन्यता वाटून ते त्यास प्रेमानें भेटले. बाणाने गुरुजनांस वंदन करून सर्वोस कुशल विचारलें. परस्परांच्या भेटी व भाषणे झाल्यावर दोन प्रहरीं ते सर्व भोजना- करितां उठून गेले. भोजनानंतर कांहीं वेळाने सर्व आप्तमंडळी त्याच्या सर्भों- वती येऊन बसली. पुढे पुस्तक वाचणारा सुदृष्टि हा पुराण वाचण्याकरितां त्या ठिकाणी व्यासपीठावर येऊन बसला, व तंतुवाद्ये वाजविणारे मधुकर व पारावत हेहि सुस्वर वाद्ये वाजविण्याकरितां तेथे येऊन बसले. मग मधुर गायनयुक्त वायुपुराण झाल्यावर हर्पराजाचें चरित्र ऐकण्याची उत्कंठा अस ल्यामुळे वाणाच्या चुलतबंधूंनी सर्वात धाकटा व बाणाचा अत्यंत प्रिय अशा श्यामलास खूण केली ! तव्हां तो नम्रतेनें बाणास झणाला, पुरूरवा, नहुष, ययाति इत्यादि राजांहूनहि अधिक अशा हर्षराजाचें चरित्र आह्मांस सांगण्याची कृपा करावी. ' 'तेव्हां हर्षचरित्र फार मोठे आहे ! तें सर्व सांगण्यास कोण समर्थ आहे? तथापि सांगतां येईल तितकें सांगेन. ' असे ह्मणून संध्याकाळची वेळ झाल्यामुळे वाण शोणनदावर संध्या कराव- यास गेला. दुसरे दिवशीं प्रातःकाली स्नानसंध्यादि कमें अटोपल्यावर बाण बसला असतां त्याचे आप्तमित्र त्याचेजवळ येऊन बसले. वाणाने त्यांचा अभिप्राय जाणून हर्षचरित सांगण्यास आरंभ केला. ८ तो ह्मणाला, सर्व समृद्धीनें पूर्ण असा श्रीकंठनांवाचा देश आहे, त्यांत स्थाण्वीश्वर नांवाचा प्रदेश आहे. त्या ठिकाणी सर्व गुणांनी संपूर्ण असा पुप्पभूति नांवाचा राजा होऊन गेला. तो मोठा शिवभक्त असे. सर्व