या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १२७ ) ते गेले. पुढें एके दिवशीं भैरवाचार्याचा शिष्य येऊन कांहीं वेळ भाषण करून ह्मणाला, आचार्यांनी सांगितले आहे कीं, आमचा शिष्य पाताल- 6 स्वामी यानें ब्रह्मराक्षसाचा परामव करून त्याचा 'अट्टहास' नामक खड्ग हरण केला आहे; तो तुझ्या हातांत राहण्यास योग्य आहे ह्मणून तुजकडे पाठविला आहे. तर त्याचें ग्रहण करावें. राजा ह्मणाला दुसऱ्याची वस्तु ग्रहण करावयाची नाहीं, असा माझा निश्चय तर खराच, तथापि गुरूची आज्ञा मला अमान्य करता येत नाहीं. " मग राजास आशीर्वाद देऊन तो परत गेला. तो खड्ग पाहतांच सर्व पृथ्वीचें राज्य हस्तगत झाल्यासारखें राजास वाटलें ! , 66 पुढें कांही दिवस गेल्यावर भैरवाचार्य राजाकडे येऊन ह्मणाले "कल्पोक्त महाकालनामक मंत्राचा कोटि जप करून मी साधन केले आहे. त्याची समाप्ति करणे मात्र साहाय्यावांचून राहिले आहे. टिट्टिभनामक यति, पातालस्वामी व कर्णतालनामक द्रविड, असे तिघे माझे शिष्य मला साहाय्य करण्यास सिद्ध आहेत. आणखी एकार्चे साहाय्य पाहिजे आहे, याकरितां तें तूं केलेंस तर कार्यसिद्धि होईल. " राजा ह्मणाला, फार बरें आहे ! आपण मजकडून सेवा करून घेण्याचा प्रसंग आणला हा मजवर मोठाच अनुग्रह केला. फार चांगली गोष्ट झाली. मी आपल्या सेवेस सिद्ध आहे ! " राजाच्या भाषणाने भैरवाचार्यास मोठा आनंद झाला. मग ते ह्मणाले " कृष्णपक्षांतील चतुर्दशीच्या रात्रीं स्मशानांतील शून्य देवालयांत शस्त्रयुक्त होऊन तूं आमच्या साहाय्यास यावें. " असें ह्मणून ते गेले. पुढें तो दिवस आला तेव्हां राजानें शैवदीक्षा धारण करून त्या खड्गाचें पूजन केलें आणि रात्रीं कोणास न कळू देतां तो स्मशानांत गेला. त्या ठिकाणीं गुरूंनी सांगितल्याप्रमाणे तिघेजण तयार असलेले राजाच्या दृष्टीस पडले. राजानें त्यांस नांवें विचारल्यावर त्यांनी आपापली नांवें सांगितलीं. मग ते ज्या ठिकाणी भैरवाचार्य साधन करीत होते त्या ठिकाणीं गेले आणि संकेताप्रमाणे पूर्वदिशेकडे पातालस्वामी, उत्तरेकडे कर्णताल, पश्चिमेकडे टिट्टिभ व दक्षिणेकडे राजा; याप्रमाणे सज्ज होऊन ते उभे राहिले. काही वेळाने त्या ठिकाणीं भयंकर आरोळ्या, एकाएकी ज्वाला होणें, वगैरे प्रकार होऊं लागले. दोन प्रहर रात्री एकाएकी मोठा आवाज होऊन पृथ्वी दुभंग झाली व तीतून एक मोठा काळपुरुष बाहेर पडला आणि तो सर्वोचा