या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १२८ ) हा तिरस्कार करून हसून ह्मणाला, "अरे विद्याघरीचें साधन करणान्या, काय हा विद्येचा तुला गर्व ! व काय तुला साहाय्याचा अभिमान ! अरे मला बळी दिल्याखेरीज तूं कर्म करीत आहेस, तर तें तुझें कोठून सिद्धीस जाणार ! तें ह्या क्षेत्राचा स्वामी मी श्रीकंडनांवाचा नाग आहे. माझ्या नांवानेंच देश प्रसिद्ध आहे, माझी इतकी शक्ति आहे कीं, मी ग्रहांचीदेखील गति कुंठित करीन. मग दुसरें तर काय ? हा विचारा राजाहि तुमच्याकरितां मृत्युमुखी पडण्यास आला आहे ! तर आतां मूर्ख राजासह सर्वजण आपल्या धाडसाचें फळ भोगा !" असे बोलून त्यानें हस्तप्रहारानें तिघाजणांस खालीं पाडलें. तेव्हां राजा त्यास ह्मणाला, 'अरे काका, हातांत शस्त्र घेऊन युद्धास उभा रहा. तुझ्या हातांत शस्त्र नसल्यामुळे माझा हात तुजवर चालत नाही. ' तो ह्मणाला, ' हः शस्त्र काय करायाचें आहे? चल ये, हातांनींच तुझा चुराडा करून टाकतों ? ' असें बोलून त्याने मोठ्यानें दंड थोपटून दिशा दणाणून दिल्या ! तेव्हां राजाहि खड्ग टाकून देऊन बाहुयुद्धास उभा राहिला. मग दोघांचें फारच भयंकर युद्ध झाले. दोघेहि रक्ताने न्हाल्यासारखे झाले. शेवटीं राजाने त्या नागास पाडून त्याचा पराभव केला. इतक्यांत एकाएकी चंद्रिकेसारखें तेज पडले व त्यामध्यें एक अपूर्व स्त्री राजाच्या दृष्टीस पडली ! मग तो तीस ह्मणाला, ' तूं कोण आहेस ? ' ती ह्मणाली, ' मी साक्षात् . लक्ष्मी आहे. तुझें विलक्षण शौर्य पाहून मी प्रसन्न झालें आहें, याकरितां वर माग ' तो ह्मणाला, ' मला कांहीं नको, माझ्या गुरूला साधनाची सिद्धि मिळावी झणजे झाले ते ऐकून ती ह्मणाली, 'राजा ! तूं मोठा थोर आहेस, तुझे कल्याण होईल. व तुझ्या वंशांत थोर पुरुष उत्पन्न होतील. ' इतकें बोलून ती गुप्त झाली. इकडे भैरवाचार्यास सिद्धि मिळाली. ते विमानांत बसून व राजास आशीर्वाद देऊन स्वर्गलोकी गेले. श्रीकंठनागहि राजाच्या पराक्रमानें लज्जित होऊन त्यास शरण गेला. तेव्हां राजानें त्यास आश्वासन देऊन स्वस्थानीं जाण्यास सांगितले. नंतर राजा त्या तिघां गुरु- बंधूंस बरोबर घेऊन आपल्या राजधानीस गेला. त्याने त्याचा चांगला सत्कार करून त्यास आपले घरी ठेवून घेतलें. कांहीं दिवस गेल्यावर टिट्टिभ तप करण्याकरितां वनांत गेला. पातालस्वामी व कर्णताल हे राजाच्या शौर्यानें संतुष्ट होऊन त्याजबरोबर शौर्याची कृत्ये करीत व राजलक्ष्मीचा उपभोग घेत आनंदांत राहिले. ' .