या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १२९ ) पुढे पुष्पभूतिराजापसून पुष्कळ प्रसिद्ध राजे त्या वंशांत उत्पन्न झाले. त्या सर्वात प्रतापशाली असा प्रभाकरवर्द्धन राजा झाला. त्या राजाची यशोवती नांवाची राणी होती. राजा मोठा सूर्यभक्त होता. तो संततीकरितां अर्ध्यप्रदान व आदित्यहृदय स्तोत्राचा नेहमीं जप करीत असे. कांहीं काळ गेल्यावर ग्रीष्मऋतूचे रात्री राजा व राणी चंद्रिकेनें रमणीय व शीतल अशा गच्चीवर निजली असतां, एके दिवशी पहाटेच्या वेळेस राणी दचकून महाराज माझें रक्षण करा ! " असें ह्मणत उठली, , 6 , , ते ऐकून राजा गडबडीनें उठला व ' देवी, भीऊं नकोस ! हामी तुझ्या जवळच आहे. ' असें ह्मणून खड्ग उपसून चहूकडे पाहू लागला तो भयाचें कांहींएक कारण दिसलें नाहीं. मग तो राणीस विचारूं लागला असतां ती ह्मणाली, 'मला अर्से स्वप्न पडलें कीं, एक कन्येसह दोन महातेजस्वी कुमार वस्त्रालंकारांनी व शस्त्रास्त्रांनी युक्त असे माझ्या उदरांत शिरले, व त्यामुळे मी ओरडलें' राजा ह्मणाला, " प्रिये आनंदाच्या वेळेस तूं उगीच भ्यालीस. भगवान् सूर्यनारायण आपल्यावर प्रसन्न झाला. त्याच्या कृपेनें आपल्यास तीन अपत्यांचा लाभ होणार, हें खचीत समज तें ऐकून यशोवतीच्या आनंदास पारावार नाहींसा झाला. पुढे लवकरच कांहीं कालाच्या अंतरानें त्यांस दोन पुत्र व एक कन्या अशीं तीन अपत्ये झाली. त्यांनी वडील पुत्राचें राज्यवर्धन, व धाकटयाचें हर्ष, आणि कन्येचें राज्यश्री, अशीं नांवें ठेवलीं. पुत्रजन्मकालीं राजानें मोठाले उत्सव पुष्कळ दानधर्म केला. पुढे राजपुत्र अमळ मोठे झाले, तेव्हां त्यांजबरोबर राहण्याकरितां देवी यशोवतीच्या भावानें आपला बुद्धिमान् मंडी नांवाचा मुलगा आणून ठेवला. त्याजवरहि राजानें आपल्या पुत्राप्रमाणेच प्रेम ठेवलें. नंतर त्या तिघांकडूनहि राजानें धनुर्वेदादिकांचा अभ्यास करविला. पुढे ते तिघे तारुण्यांत येऊन मोठे पराक्रम करण्यासारखे झाले. करून एके दिवशीं भोजनानंतर राजानें दोघां पुत्रांस जवळ बोलावून झटलें, ‘राजाला चांगले सेवक मिळणे फार कठिण आहे. वाईट लोक मनोरंजन करून राजास फसवितात ! व त्यामुळे सर्वस्वी नाश होतो. याकरितां तुमच्या सेवेकरितां व सहवासाकरितां मालवराजाचे पुत्र दोघे बंधू कुमारगुप्त व माधव गुप्त यांची योजना केली आहे. ते कुलीन, पापभीरू व पराक्रमी आहेत. त्यांची परीक्षा मी पुष्कळ वेळां पाहिली आहे. तर त्यांस हे आपलेच आहेत अर्से समजा. ' १७