या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १३१ ) पाहिले की, भोंवतालच्या अरण्यास वणवा लागला आहे व त्यांत एक सिंह दग्ध होत आहे ! हें पाहून सिंहीने आपली मुलें टाकून वणव्यांत उडी टाकली ! ते पाहून हर्षाच्या मनांत आलें, स्नेहपाश किती बळकट असतात पहा ! व त्यामुळे पशु देखील आपल्या जिवाकडे पहात नाहींत ! मग तो जागा झाल्यावरहि कांहीं अपशकून त्याचे दृष्टीस पडले. त्यामुळे त्याचे अंतःकरणांत चिंता उत्पन्न झाली. दोन प्रहरच्या वेळेस तो चिंताक्रांत बसला असतां, घाईघाईनें येत असलेला, उन्हामुळे व चिंतेमुळे काळा ठिक्कर पडलेला, श्रमामुळे धापा टाकीत येत अस लेला कुरंगकनांवाचा सेवक त्याच्या दृष्टीस पडला. त्यानें धावत येऊन व प्रणाम करून हर्षापुढें एक पत्र टाकलें, ते वाचून हर्ष घाबरून ह्मणाला, “कुरंगका, ताताच्या प्रकृतीस असे काय झाले आहे? " तो दुःखाचा सुस्कारा टाकून झणाला, " महाराजांनां विषमज्वर झाला आहे, असे ह्मणतात. " ते ऐकतांच हर्षाचे पोटांत धस्स झाले. मग पित्यास आराम पडावा, ह्मणून पुष्कळ दानधर्म करून भोजन न करतां तसाच तो घोड्यावर बसून त्यास भरधाव फेकीत चालता झाला. त्याच्या बरोबरचे सेवकहि पाठीमागून गडबडी. ने धावत गेले. मग कोठेंहि विसावा न घेतां तो घोडा फेकीत चालला असतां संध्याकाळ झाला तेव्हां भंडीप्रमुख सरदारांनी आहार करण्याकरितां विनंति केली तरी कांहीं एक न खातां तसाच सर्व रात्रभर चालून तो दुसरे दिवशीं दोनप्रहरीं आपले राजधानीस (स्थानेश्वर येथें) येऊन पोहचला. त्याठिकाणी त्याला सर्व उत्साहरहित दिसलें! राजवाड्यापार्शी येऊन तो घोड्यावरून उतरला व आंत शिरला, तो त्यास सुषेणनांवाचा वैद्य भेटला. तेव्हां हर्षानें त्यास विचारलें "ताताच्या प्रकृतीस कांहीं आराम आहे काय ?" तो ह्मणाला अद्याप कांहीं नाहीं, आपली भेट झाल्यावर कांहीं आराम पडला तर पडेल ! " मग राजवाड्यांत गेल्यावर पित्यास आराम पडावा झणून ज्या. ठिकाणी जप, होम, देवपूजन औषधक्रिया, वगैरे प्रकार चालले होते त्या ठिकाणाकडून जेथें आपला पिता विव्हळत पडला होता, त्या ठिकाणीं तो गेला. पित्याची अवस्था पाहून हर्षाचें धैर्य अगदी खचून गेले. आपला प्रियपुत्र आल्याचें राजास कळतांच तो " 'ये' 'ये' बाळा!" असे ह्मणून त्यास दृढालिं- गन करण्यास उत्कंठित झाला. हर्षानें परम नम्रतेनें पित्यास व मातेस नमस्कार करून तो त्यांच्या जवळ जाऊन बसला. मग पापणीस पापणी न 21 MAR 1990