या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(8)

लोकांकडूनहि मराठी भाषेची बरीच सेवा करण्यांत आली आहे, हेहि येथे सांगणे जरूर आहे.

 आतां बरीच मंडळी असा आक्षेप घेतील की, पूर्वीच्या ग्रंथकारांस राजे- रजवाड्यांकडून उदारआश्रय मिळत असे, व त्यामुळे त्यांजकडून ग्रंथ होत असत. ही गोष्टहि कांहीं मिथ्या नाहीं. प्रसिद्ध भट्टकुळांतील वैयाकरण नागोजीभट्टानें शृंगवेरपुराधीश रामराजा यापासून आपणास आश्रय असल्याचें शब्देंदुशेखराच्या आरंभी नमूद करून ठेविले आहे. दुसरींहि आणखी पुष्कळ उदाहरणे आहेत. जसे- सायनमाधवास बुकणराजाचा, हेमाद्रीस रामदेवराव जाधव याचा, विज्ञानेश्वरास विक्रमादित्यराजाचा, जगन्नाथास शहाजहानबादशहाचा चांगला आश्रय होता. फार दूर कशाला ? प्रस्तुत ग्रंथकार बाणकवि हाच याचें ढळढळीत उदाहरण आहे ! बाणकवीस हर्षराजाचा आश्रय मिळाल्यामुळे त्याजकडून ग्रंथ झाले असतील, कदाचित् ही गोष्ट खरी असली तरी सर्वच ग्रंथकार धाकटया ( लक्ष्मी ) बाईनें आपल्याकडे घेतले आहेत असे मात्र म्हणता यायचे नाहीं ! तर तिने त्यांची वाटणी करून मानाप्रमाणे अधिक ग्रंथकार आपल्या थोरल्या बहिणी- च्या वाटचासच दिले असल्याचे आढळतें ! 'विद्वान् दरिद्रो यतः 'विद्वत्सु दारिद्रता' इत्यादि वचनें या गोष्टीची चांगली साक्ष देत आहेत! व्यक्तिविषयक उदाहरणे पाहूं गेलें असतां पुष्कळ आहेत. त्यापैकी संस्कृत कवि भारविकवीचे प्रसिद्ध व ढळढळीत आहे. एके दिवशीं भारवीच्या घरी उप जीवनास धान्य नव्हते, तेव्हां त्याची स्त्री त्याजकडे जाऊन ' आज घरांत धान्य वगैरे कांहीं एक नाहीं!' असे काकुलतीनें म्हनाव तेव्हां भारवीनें सहसा विदधीत न क्रियामविवेकः परमापदां पदम् ' हे श्लोकार्ध लिहून दिलें व हे रस्त्यांत नऊन लोकांनां दाखीव, असे सांगितले. पुढे त्याप्रमाणे तिनें केलें. तेव्हां एका धनिकानें तें श्लोकार्ध घेऊन तिला बरेंच द्रव्य दिले.


१ " पातंजले महाभाध्ये कृतभूरिपरिश्रमः ।
शिवभट्टमुतो धीमान् सतीदेव्यास्तु गर्भजः ॥
याचकानां कल्पतरोररिकक्षहुताशनात् ।
शृंगवेरपुराधीशात् रामतो लब्धजीविकः ॥
नत्वा फणीशं नागेशस्तनुतेऽर्थप्रकाशकं ।
मनोरमोमार्धदेहं लघुशब्देंदुशेखरं ||"