या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १३३ तर हर्षाचें दुःख अगदी अनावर झाले. म. तो ज्या ठिकाणी आपली आई होती, त्या ठिकाणी गेला व तिचे पायांवर मस्तक ठेवून ह्मणाला, आई, तूंहि मला हतभाग्याला सोडून कशी चाललीस! तर असें करूं नकोस! प्रसन्न हो व मजवर दया कर ! तें ऐकून यशोवतीस फारच अवघड वाटलें आणि तीस आपल्या वडील पुत्राची व सासरी गेलेल्या कन्येची आठवण होऊन तिनें पुष्कळ शोक केला. मग तिनें हर्षास जवळ घेऊन त्याचे डोळे पुसले व कष्टानें दुःखाचा वेग दाबून ती त्यास ह्मणाली, ' बाळा, हर्पा, तूं यावेळी मला आड येऊं नकोस ! तुझा पिता परलोकी गेल्यावर माझी मांगें राहण्याची काय शोभा बरें ! याकरितां मी अविधवा असतांनाच परलोकीं जातें, वीरकन्या, वीरपत्नी, वीरमाता मी असतां मला मरणाचं भय कसचें ? याकरितां बाळा मला विघ्न करूं नकोस !" अशा तिच्या भाषणानें हर्ष अगदी घाबरून गेला. त्यास कांहीं सुचेनासे झालें व तो खालीं मान घालून बसला. मग यशोवतीनें पुत्रास आलिंगन करून व त्याच्या मस्तकाचे अवघ्राण करून ती अंतःपुरांत गेली. व तिनें आपल्या अलंकारादिकांचा दानधर्म केला. तेथून ती सरस्वतीनदीवर गेली. तेथे गेल्यावर तिर्ने अभि प्रज्वलित करून व त्याचें पूजन करून त्यांत प्रवेश केला ! 66 मातृमरणानें हर्षास अतिशय दुःख झालें, ते किती ह्मणून सांगावें ! मग तो तसाच दुःख आवरून आपल्या पित्याजवळ जाऊन बसला. पित्याची फारच कठिण अवस्था पाहून हर्षास दुःख आवरेनासे झालें व तो मोठ्यानें रडत बसला. नंतर कांहीं वेळानें राजा शुद्धीवर येऊन हर्षास ह्मणाला, बाळा तुझ्यासारख्या धीरांनी प्रसंगास सादर असले पाहिजे ! धैर्य घर, राज्यलक्ष्मीचा उपभोग घे, शौर्याची कृत्ये कर, इहलोकच्या व परलोकच्या अशा सुखाची साधनें कर. असे धैर्य सोडूं नकोस." इतके बोलून राजानें डोळे मिटले ते पुन: उघडले नाहींत ! तेव्हां राजवाड्यांत जिकडे तिकडे एक- सारखा आक्रोश चालू होता तो अधिकच वाढला. नंतर शवशिबिका आणून तिजवर राजाचें प्रेत घातले. मग हर्प, मांडलिक राजे, आप्त, मित्र प्रधान व इतर लोक यांसह शवशिबिकेबरोबर सरस्वती नदीवर गेला व त्याने पित्या- च्या कलेवराचें यथाविधि दहन केलं आणि सर्व क्रिया यथाशास्त्र केल्या. पुढें हर्षाचा बराच काळ अत्यंत दुःखांत गेला. त्याच्या पदरचे पंडित, पुरा-