या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १३४ ) भी णिक व इतर सज्जन यांनी आपल्याकडून ग्रंथांतील व इतिहासांतील गोष्टी सांगून हर्षाचा शोक कमी होण्याविषयी आपल्याकडून पुष्कळ प्रयत्न केला. पुढें राज्यवर्धन परत घरीं आला, तेव्हां दोघां भावांनी मातापित्यां- विषय फारच शोक केला. मग राज्यवर्धन दुःखावेशानें हर्षास ह्मणाला, बाबा हर्षा ! तूं लहानपणापासूनच आपल्या सद्गुणांनी सर्वांचें अंतःकरण हरण केले आहेस, याकरतां तूंच सिंहासनावर बसून राज्य चालीव. तर अरण्यांत राहून व पवित्र तीर्थोदकांचीं स्नानें करून काळ घालविणार ! याकरतां मला आतां या शस्त्रास्त्रांचा संबंध नको ! " असे ह्मणून त्यानें आपले हातांतील खड्ग टाकून दिला ! ते पाहून शूलप्रहारानें विदीर्णहृदय झाल्यासारखे हर्षास झाले व त्याच्या मनांत अनेक कल्पना उभ्या राहिल्या! तो ह्मणाला, " कोणीं दुष्टानें माझ्या भावाच्या मनांत भलतेंच भरवून दिलें की काय कोण जाणे ! किंवा माझी परीक्षा पाहण्याकरतां तर तो असे करीत नसेलना ? किंवा माझ्या तोंडांतून भलताच शब्द तर निघाला नसेल ना ? अथवा सर्व वंशाचा नाश करण्याकरितां तर दुर्दैवानें हा खेळ मांडला नसेल किंवा ताताच्या अभावामुळे निर्भय झालेल्या कलिकालाची तर ही क्रीडा नसेलना ? याप्रमाणे एकामागून एक अनेक कल्पना त्याच्या मनांत आल्या. मंग त्यानें असा निश्चय केला की, प्रियबंधु जर सर्व सोडून वनांत जात आहे तर मला तरी येथें राहून काय करावयाचे आहे ? " असें ह्मणून तो खालीं तोंड घालून बसला. ना ? मग आज्ञेप्रमाणें सेवकांनी मोठ्या दुःखानें वल्कलें आणून राज्यवर्धना- पुढें ठेविली, तेव्हां आप्त, मित्र, स्त्रिया व सेवक यांनीं रडून आकांत केला व सर्व लोक त्याजबरोबर अरण्यांत जावयास सिद्ध झाले ! इतक्यांत शोकानें विव्हल झालेला राज्यश्रीच्या जवळ असणारा सं वादक नामक सेवक सभेत आला व आपलें अंग भूमीवर टाकून देऊन मोठ्यानें आक्रोश करूं लागला. ते पाहून राज्यवर्धन व हर्ष दोघेहि घाबरे झाले व त्याचे जवळ जाऊन ह्मणाले: “ अरे सांग लवकर सांग. पितृमरणानें निर्भय झालेलं दुर्दैव आम्हांस अधिकाधिक दुःख देण्यास जसे पाठीस लागले आहेस दिसते ! " मग संवादक मोठ्याने रडत सांगू लागला. "महाराज वारल्याचें वर्तमान समजतांच दुष्ट मालवराजानें ग्रहवयिस मारिलें, आणि राजपुत्री राज्यश्री इच्या पायांत बिड्या घालून कान्यकुब्ज ( कनोज )