या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १३७ ) थोडी विनंति करतो ती ऐकावी. आर्य राज्यवर्धनाच्या परिणामावरून 21 JAN 1994 दुष्टांचे स्वभाव कसे असतात, हे आपल्या लक्षांत आलें असेलच. विश्वासानें असे पुष्कळांचे घात होतात व झाले आहेत. कोणाकोणाचे कसकसे घात झाले, यांविषयीं त्यानें इतिहासांतील पुष्कळच उदाहरणें सांगितली. नंतर तो सैन्याची तयारी करण्यास गेला. त्याचे ग्रहण हर्ष शत्रूवर स्वारी करण्याकरितां सिद्ध झाल्यावर प्रयाणकालीं तो शिव- पूजन करून व पुष्कळ दानधर्म करून निघाला. तो दिग्विजय करीत चालला असतां प्रथमतःच प्राग्ज्योतिष ( ब्रम्हदेश किंवा असाम ) च्या कुमारराजाकडून हंसवेगनांवाच्या सेवकाबरोबर आश्चर्यकारक रत्नखचित छत्राचा नजराणा हर्षास आला. तो शुभशकुन समजून हर्षानें केले व हंसवेगास त्यानें उत्तम वस्त्रालंकार दिले. रात्रीं राजे लोकांबरोबर थोडावेळ बोलून ते गेल्यावर हर्ष हंसवेगास ह्मणाला, काय तुझ्या स्वामी - चा निरोप असेल तो सांग. तो ह्मणाला ः— आमचा राजा कुमार भास्कर वर्मा हा भगदत्ताच्या वंशांत उत्पन्न झाला आहे. त्याचा असा संकल्प आहे कीं, शंकरराखेरीज दुसरे कोणास मस्तक नम्र करावयाचें नाहीं ! तर हा निश्चय सर्व पृथ्वी जिंकण्यानें अथवा मृत्यूनें किंवा महाराजासारख्या महा- पराक्रमी मित्राने शेवटास जाणार आहे. याकरितां महाराजांच्या विचारास येत असल्यास कुबेराचा शिवाशी, दशरथात्रा इंद्राशीं, किंवा अर्जुनाचा कृष्णाशीं, जसा योग जमला; तसा हा योग होईल. आपल्याशी स्नेह व्हावा अशी आमच्या स्वामीची उत्कट इच्छा आहे, तर आपल्या ध्यानांत कसे काय येतें, त्याप्रमाणे आज्ञा व्हावी. यावर हर्ष ह्मणाला - " हंसवेगा, अशा परोक्ष प्रीति करणाऱ्या कुलीन कुमाराबरोबर कोण स्नेह करणार नाहीं ? तुझ्या स्वामीची जशी इच्छा आहे तशीच माझीहि आहे. " अर्से बोलून इर्षानें हंसवेगाबरोबर परत नजराणा देऊन त्यास निरोप दिला. पुढें हर्ष शत्रूवर आवेशाने जात असतां मार्गाने एके दिवशी ने जिंकलेल्या मालवराजाची संपत्ति घेऊन भंडी येत आहे असें त्यास समजलें. त्याबरोबर त्यास बंधूचें स्मरण होऊन तो सर्व व्यापार सोडून व एकीकडे जाऊन दुःखित होऊन-भंडीची वाट पहात बसला. पुढे थोड्याच वेळानें भंडी त्या ठिकाणी येऊन हर्षाच्या भेटीस गेला. तेव्हां शोकामीनें दग्ध झाल्यामुळे काळा टिक्कर पडलेला, दुर्योधनाच्या मरणानें खिन्न झालेल्या राज्यवर्धना-