या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १३८ ) अश्वत्थाम्यासारखा तो हर्षाच्या दृष्टीस पडला ! त्या वेळी दोघांनीह राज्यवर्धनाविषयी फार शोक केला. मग काही वेळानें भंडीनं हर्षास घड लेला सर्व वृत्तांत सांगितला. हर्षाने मोठ्या उत्कंठेने आपल्या बहिणीचें वर्तमान विचारले तेव्हां भंडीने सांगितले की, “राज्यवर्धनाचा अंत झाल्या- वर गुप्तानें कान्यकुब्ज घेतलें. त्या गडबडीत राज्यश्री बंदींतून सुटून आपल्या परिवारासह विन्ध्यारण्यांत गेली. तिच्या शोधाकरितां मीं पुष्कळ लोक पाठविले आहेत, परंतु अद्यापि कांहीं शोध नाहीं !" याप्रमाणे त्याचे भाषण ऐकून हर्षास आपल्या बहिणीविषयीं फार वाईट वाटलें आणि तो ह्मणाला ' दुसरे जाऊन काय उपयोग? मी स्वतः तिच्या शोधाकरितां जातों. तूं हें सैन्य घेऊन गौडाचा सूड उगविण्याकरितां पुढें हो. ' असें बोलून हर्ष उठला. नंतर त्यानें स्नान करून भंडीबरोबर उपहार केला, व त्याजबरोबर बोलण्यांत तो सर्व दिवस घालविला. दुसरे दिवशीं भंडीनें हर्षा स विनंति केली की, "राज्यवर्धनाच्या पराक्रमानें हस्तगत झालेली मालव राजाची संपत्ति अवलोकन करावी. " असे म्हणून त्यानें हत्ती, घोडे, स्त्रि- यांच्या अंगावरील अत्युत्तम अलंकार, व छत्रचामरादि अनेक वस्तु त्यास दाखविल्या. 43 . दुसरे दिवशी हर्ष आपल्या बहिणीच्या शोधाकरितां कांहीं लोक बरोबर घेऊन विन्ध्याटवीत शिरला व तिचा शोध करीत हिंडूं लागला. एके दिवशीं तेथील मांडलिक राजाचा पुत्र व्याघ्रकेतु हा एक्या तरुण मिल्लाला घेऊन हर्षराजाजवळ आला आणि म्हणाला, महाराज आपल्या मिल्लसेनापतीचा हा भाचा आहे. याचें नांव निर्घात. याला ह्या अरण्यांतील प्रत्येक पानाची देखील माहिती आहे. याकरितां याला जी काय आज्ञा करावयाची असेल ती करावी. " नंतर निर्घातानें हर्षास पशुपक्ष्यांची भेट अर्पण करून नमन केलें. तेव्हां हर्ष त्यास ह्मणाला, तुझें व तुझ्या मंडळीचें या अरण्यांत नेहमी फिरणे आहे, याकरितां एकादी राजघराण्यांतली स्त्री कोणाच्या दृष्टीस पडल्याबद्दल कांहीं वर्तमान समजलें आहे का ?" तो हात जोडून ह्मणाला, महाराज, येथें हरणी सुद्धां संचार करण्यास भितात, मग बायको माणूस तर कोठून येणार ? तथापि महाराजांची आज्ञा असेल तर सर्व कामधंदा सोडून आझी शोध करीत हिंडतों. येथून एक कोसावर नदीच्या कांठीं झाडीत दिवाकरमित्र नांवाचा साधु पुष्कळ शिप्यमंडळीसह राहतो, त्याला 66 6