या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १३९ ) कदाचित् त्याच्या शिष्याकडून कांही शोध लागला असेल तर कोण जाणे ! ' तें ऐकून हर्ष आपल्या मनांत ह्मणाला ग्रहवर्म्याचा बालमित्र मैत्रायणी - शाखेचा ब्राह्मण तारुण्यांतच बुद्धदीक्षेचा स्वीकार करून तपश्चर्येस गेल्याबद्दल ऐकिलें होतें खरें ! मग त्याच्या भेटीविषयीं हर्षास फारच उत्कंठा वाटून तो त्यास ह्मणाला, " तें ठिकाण कोठें आहे तें आह्मांस दाखीव बरें ? " असे ह्मणून तो त्याजबरोबर चालू लागला. पुढे नदी आली तेव्हां हर्षास वाटले की, तें ठिकाण आतां येथून जवळच असावें, याकरितां सैन्य येथेच ठेवून आपणच पुढे जावें. असा विचार करून व विनीत वेष धारण करून माधवगुप्तासमवेत थोडके लोक बरोबर घेऊन तो त्या ठिकाणीं गेला. ला, आपल्या तेथें त्यानें अनेक शास्त्रार्थीचे प्रतिपादन करणान्या अशा दिवाकरमित्रास पाहिलें. मग हर्षानें पुढें होऊन दिवाकरमित्रास नमस्कार केला. त्याच्या आकृतीवरून हा कोणी थोर पुरुष असावा असें दिवाकर मित्रास वाटून त्यानें त्याचा सन्मान करून बसावयास आसन देवविलें. तथापि त्यावर न बसतां हर्प नम्रतेनें भूमीवरच बसला. राजास पाहतांच दिवाकर मित्रास वाटलें, ज्यांच्या उदरी असले रत्न निर्माण झालें, ते धन्य होत. हा केवळ पुण्याचा राशि व सद्गुणांचा पुतळाच भासतो आहे ! मग तो राजास ह्मणा- तुमच्या आगमनानें आह्मास फार आनंद झाला. परंतु तुझास अशा प्रदेशीं येण्याचें कोणतें कारण पडले असावें बरें ?" हर्ष ह्मणाला. सत्कारानें व मधुर भाषणानें भी कृतकृत्य झालों. माझे येथे येण्याचे कारण असे आहे की, माझ्या दुर्देवाने माझे बरेच आप्त अल्पकालांत नष्ट झाले. माझ्या धाकट्या बहिणीच्या पतीचा दुष्ट शत्रूनें प्राणघात केल्यामुळे ती त्या. पासून भीऊन या महारण्यांत पळून आली, असे समजल्यावरून तिच्या शोधाकरितां मी ह्या वनांत आलो आहे; परंतु तिचा अद्यापि कोठें शोध लागत नाहीं. याकरतां जर आपणास एखाद्या स्त्रीची वार्ता कोणाच्या मुखानें कळली असल्यास सांगण्याची कृपा करावी ! " असें राजाचे दीन भाषण ऐकून दिवाकर मित्रास फार वाईट वाटले आणि तो ह्मणाला अद्यापपर्यंत तर कोणाकडून हें वर्तमान समजलें नाहीं !" याप्रमाणे बोलणें चाललें होतें तो इतक्यांत एक शिष्य गडबडीनें येऊन दिवाकरमित्रास ह्मणाला, “ गुरुजी ! एक तरुण स्त्री अतिदुःखाने त्रस्त झाल्यामुळे अनीत प्रवेश करीत आहे! याकरितां आपण तेथपर्यंत येण्याचें श्रम घेऊन व गरीब आह्मास