या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५ )

ज्याने द्रव्य हें श्लोकार्थ घेतलें, त्यानं ते आपल्या निजण्याच्या खोलीत मोठ्या अक्षरांनी लिहून ठेवलें होतं. पुढें तो बरीच वर्षे कांहीं कामाकरितां दूर देशीं गेला होता, तो परत घरी आल्यावर आपली स्त्री परपुरुषाशेजारी पलंगावर निजली आहे, असे त्यांस वाटून त्या दोघांचा शिरच्छेद करावा, असें त्याच्या मनांत आलें व तो खुंटीवरची तलवार घेण्यास गेला. तों तेथें लिहिलेलें हें श्लोकार्ध त्याच्या दृष्टीस पडलें ! तेव्हां तो साहसकर्मापासून परावृत झाला ! मग त्यानें आपल्या स्त्रीस उठविलें तेव्हां ती गडबडीनं उठून हसत बाळ्या ऊठ ऊठ लवकर ह्मणून. आपल्या मुलास हाका मारूं लागली. त्यावेळीं ह्या श्लोकार्धानें भयंकर अनर्थ टळला ह्मणून त्याने मोठ्या आनंदाने आणखीहि द्रव्य भारवीकडे पाठवून दिलें ! अशी आख्यायिका आहे. यावरून भारवीसारख्या महाकवींचीं कांहीं कांहीं वचनें किती चहुमोल म्हणण्यापेक्षा अमोलच आहेत असेंच झणणे अधिक शोभेल ! मराठी कवींतहि प्रसिद्ध मोरोपंतकवीचें अगदीं ताजें उदाहरण आहे. मोरोपंताने उपजीवनसाधन - कर्णाश्रित लेखणी-कांहीं कारणानें खाली ठेवल्यावर पुष्कळ संस्कृत व प्राकृत कार्ये केली. ती कोणाकडून उत्तेजन मिळाल्यामुळे केली, असे मुळींच ह्मणतां यावयाचें नाही. त्याचप्रमाणे रंघुनाथपंडिताचेंहि उदाहरण होय. ह्या कवीचें सुरस दमयंतीस्वयंवर' तर सर्वत्र प्रसिद्धच आहे. परंतु अलीकडे त्याचीं आणखी दोन पद्यात्मक काव्ये सांपडली आहेत. एक 'गजेंद्रमोक्ष ' व दुसरे ' रामदासवर्णन ' पहिले काव्य दमयंतीस्वयंवराच्या खालोखाल आहे. ह्या काव्यांत दमयंतीस्वयंवरांतील कांही पद्यांतील चरणहि आढळतात. दुसरे काव्य त्यापेक्षां लहान आहे. हा कवि शके १५८२ - १६३२ पर्यंत हयात होता.
 पुढे दाखल केलेले पद्य रघुनाथपंडिताच्या तोंडचे त्याच्या दुःस्थितीचे दर्शक आहे.

'
ह्यातारा बहु जाहलों कवणहि त्राता नसे भेटल
भाताची तजवीज हो न उदरीं भाता गमे पेटला
हातामाजि नसेच एक कवडी हा ताप आतां हरी
दातारा मज वाचवी सदय हो मातापिता तूं हरी
'

१ ग्रंथमाला १२८, नोव्हेंबर १९०४ पहा.