या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १४३ ) हे जग चालले आहे ! असो, आपल्यास माझी अशी विनंति आहे का, क्रोधाच्या आवेशांत शत्रुनाशाविषयीं मी सर्वांसमक्ष प्रतिज्ञा केली आहे ती सिद्धीस नेली पाहिजे. तरी, ही माझी बहीण मजजवळच रहावी व आपण कांहीं दिवस माझ्या समागमें राहून धार्मिक कथा व साधुपुरुषांची चरित्रे व उपदेशाच्या गोष्टी सांगून हिचे दुःख कमी होईल अशी कृपा करावी. दुसन्यावर अनुग्रह करणे, हा सत्पुरुषांचा स्वभावच आहे. दधीचऋषीनें परोपकारार्थ जीविताची देखील परवा न करता आपल्या शरीरांतील अस्थि काढून दिले. साक्षात् बौद्धानें सिंही प्रसूत होऊन आपली अर्भकें खाऊं लागली तेव्हां आपल्या शरीराचें मांस देऊन बालकावर दया केली. गुरुजीस सर्व माहीत आहेच! आपणापुढे मी काय सांगावयाचें आहे ? तेव्हां प्रार्थना ह्मणून इतकीच कीं, आपल्या सहवासान व बोधाने माझ्या भगिनीचें दुःख कमी व्हावे व तिनें कांहीं काळ मजबरो- बर घालवावा, अशी माझी इच्छा आहे. माझी कर्तव्यें उरकल्यावर ती व मी दोघेहि बौद्धदीक्षेचा स्वीकार करूं." यावर दिवाकरमित्र ह्मणाला, हर्षा, तुझ्या सद्गुणांनी आमचे अंतःरणाचें आकर्षण केले आहे, या- करितां वारंवार सांगण्याचे कारणच राहिलें नाहीं !" मग ती रात्र त्या ठिकाणीं घालविल्यावर हर्षानें निर्धातास वस्त्र व भूपर्णे देऊन निरोप दिला. नंतर तेथून निघून तो गंगातीरी आपले सैन्य तळ देऊन राहिलें होतें तिकडे तो दिवाकर- मित्रास बरोबर घेऊन आपल्या भगिनीसह गेला. तेथें आप्तमित्रांस राज्यश्री- च्या संबंधाच्या गोष्टी सांगत असतां सूर्यास्त झाला व नंतर चंद्रोदय झाला ! 66 13 MAY 2007]