या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कादंबरीच्या पूर्वाधांतील संक्षिप्त कथानक- मालवदेशांत विदिशा नांवाची राजधानी होती. तेथें पूर्वी शुद्रकराजा राज्य करीत असे. तो सार्वभौम असल्यामुळे सर्व राजे त्याच्या आज्ञेत असत. तो गुणवान् असल्यामुळे सर्वोस अत्यंत प्रिय असे. त्याचा सर्वत्र मोठा दरारा असे. त्याच्या राज्यांत सर्व लोक आपापल्या धर्मानें वागत असत व कोठें अन्याय होत नसे. त्याचे प्रधान नीतिज्ञ व राजनिष्ठ असत. राजाचें लक्ष नेहमी पराक्रमाची कृत्ये करण्याकडे व शरीरसंपत्ति राखण्या- कडे असल्यामुळे तो विषयासक्त न राहतां राज्यकारभारांत व अनेक सत्कृत्ये करण्यांत आपला वेळ घालवीत असे. एके दिवशीं शुद्रकराजा सभेत बसला असतां, एक द्वारपालिका राजा- जवळ येऊन ह्मणाली, महाराज, एक चांडालकन्या सुंदर राघू घेऊन बाहेर आली आहे. तिची अशी विनंति आहे की महाराजाजवळ अनेक रत्ने आहेत, त्यांत हेंहि एक रत्न असावें ! " तेव्हां राजास उत्कंठा वाटून त्यानें तीस तिला घेऊन येण्यास सांगितले. मग आज्ञेप्रमाणे ती चांडाल. कन्या मंडपांत आली. तिजबरोबर एक सातारा व राघूचा पिंजरा हातांत घेतलेला एक मुलगा होता. तिचें स्वरूप पाहून राजाच्या मनांत आलें, कायहो हा ब्रह्मदेवाचा वेडेपणा ! त्यानें पहा भलत्याच ठिकाणी असें सौंदर्य उत्पन्न केलें ! मग त्या सर्वांनीं लवून प्रणाम केल्यावर तो वृद्ध मनुष्य राघुचा पिंजरा राजापुढे ठेवून ह्मणाला, महाराज, हा पक्षी एक अमूल्य रत्न आहे. ह्मणून आमच्या धन्याची मुलगी हें आपणांस अर्पण करण्याकरितां येथं आली आहे. हा रावा सर्व भाषा जाणतो. याचें नांव वैशंपायन इतक्यांत त्या राज्याने आपला राजा ! तुझा जयजयकार असो " असें झटले. ते ऐकून राजास मोठे आश्चर्य वाटलें. इतक्यांत दोन प्रहरचा चौघडा वाजूं लागल्यामुळे राजा स्नानास उठला, त्याबरोबर सर्व उठले. राजानै त्या चांडालकन्येस विश्रांति घेण्यास सांगून त्या राघूची पिण्याची चांगली व्यवस्था ठेवण्यास दासीस सांगितले. मग राजाने स्नान उजवा पाय वर करून खाण्या- .