या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १४७ ) दूतांसारखा भिल्ललोकांचा समुदाय माझे दृष्टीस पडला. त्यांच्या मध्यभागीं त्यांचा मुख्य नायक होता. तो अगदीं तारुण्याच्या भरांत होता. त्याचा देह काळा कुळकुळीत व इतका बळकट होता की, हा लोखंडाचा पुतळाच आहे की काय असे भासत होतें ! त्याच्या अंगावर घर्माचे बिंदु व मारलेल्या पशूंचे रक्तबिंदु दिसत होते. त्याची मुद्रा रागीट दिसत होती. त्याच्यामागून त्याचे शिकारी कत्रे धावत येत होते. त्याच्या सभोवती भिल्ललोकांची गर्दी 'होती. त्यांच्यापैकी कोणाच्या हातांत वनगाईचीं पुच्छे, कोणाच्या हत्तीचे दांत, कोणाच्या सिंहाचीं व वाघाची कातडीं, कोणाच्या मांस, कोणाच्या मोराचीं पिसें; अशा अनेक वस्तु होत्या ! याप्रमाणे त्या लोकांस पाहिल्यावर माझ्या मनांत आलें कीं, कायहो या लोकांचें जिणें आणि आचरण ! याप्रमाणे मनांत येत आहे तो तो भिल्लांचा नायक विश्रांतिकरितां त्याच शाल्मलीवृक्षाखाली आला. मग सेवकानें आणून दिलेले उदक प्राशन करून व कांही वेळ विश्रांति घेऊन तो परिवारासह निघून गेला. त्यांच्यापैकींच एक म्हातारा भिल्ल मागे राहिला होता. त्याला त्या दिवशीं मांस मिळाले नव्हतें, म्हणून ते सर्व निघून गेल्यावर तो त्या शाल्मली- वृक्षाकडे टक लावून पाहू लागला. त्या वेळीं तो आपल्या नेत्रांनी आमची आयुष्यें पितोच आहे काय असे वाटलें ! मग तो वृक्ष अत्युच्च होता तरी त्यावर पायऱ्यांनी चढावें याप्रमाणे तो सहज चढला. आणि जशीं काय त्या झाडाची फळेंच तोडतो आहे काय ? अशा रीतीने चहूकडची घरट्यांत असलेलीं राघूंचीं पिलें काढून व त्यांच्या माना मुरगाळून त्यांनां तो खालीं टाकून देऊं लागला ! ते पाहून माझा बाप भयानें थरथर कापूं लागला. पुढें काय करावं हे त्यास सुचेनासे झाले. मग ममतेमुळे मला पंखांच्या आंत झाकून तो पोटाशीं घट्ट धरून बसला. इतक्यांत तो दुष्ट काळ आमच्या घर- ट्याजवळ येऊन त्यानें कृष्णसर्पासारखा आपला हात आमच्या घरट्यांत घातला! त्यावेळी माझ्या बापानें गोंगाट करून त्याच्या हातास चोचीनें प्रहार केले. तरी त्या अघमानें त्यास न सोडतां घरटयाबाहेर काढून मारलें व त्यास खाली टाकून दिलें ! माझ्या आयुष्याची दोरी बळकट असल्यामुळे त्या जबरोबर मी पानांच्या ढिगावर पडलों. त्यामुळे मला इजा झाली नाहीं. जोपर्यंत तो दुष्ट खाली आला नाहीं तोपर्यंत प्राण वांचवावे असे माझ्या मनांत