या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १४८ ) येऊन मी हळूच सरकत सरकत कांहीं अंतरावर गेलों. प्रिय पित्याची ती अवस्था पाहून प्राणत्याग करण्यासच योग्य, असा तो समय असतां तितका समजे नसल्यामुळे मी घाबरून तेथे एक तमालवृक्ष होता त्याच्या बुंध्यांत जाऊन दडून बसलों ! तेव्हां दुसन्या पित्याच्या मांडीवरच येऊन बसलों असें मला वाटलें ! पुढें तो भिल्ल खाली उतरून व मारून टाकलेली पिलें गोळा करून धावत धावत निघून गेला. पितृमरणदुःखानें व उंचून पडल्यामुळे माझे सर्वांग कांपत होतें. घसा कोरडा पडल्यामुळे आतां जीव जातोसें वाटत होतें. गवताची काडी हालली तरी तो दुष्ट फिरून आला की काय अर्से मला भासत होतें. मग पाणी पिऊन तहान भागवावी ह्मणून अनुमानानें सरोवराकडे मी चालू लागलों. चालण्याची सवय नसल्यामुळे वारंवार तोंडघशी पडूं लागलों. नाकातोंडांत व डोळ्यांत माती शिरून जीव घाबरा होऊं लागला. त्यावेळी माझ्या मनांत आले की, किती जरी हाल झाले तरी प्राण्यास जीविताशा सुटत नाहीं ! माझा प्रियपिता परलोकास गेला तरी मी आपल्या जीवाचें रक्षण करीत आहें! धिक्कार असो मला ! पुढें पाणी पाहत चाललों तों सरोवर बरेंच दूर असावे असे वाटलें. दोन प्रहर झाल्यामुळे सूर्य जसा काय ठिणग्यांचा वर्षावच करीत आहे असे वाटलें ! मला चाल- वेनासें होऊन डोळ्यांपुढे अंधारी येऊन दुष्टदैव एकदाचें मरण देईल तर बरे असे वाटू लागले ! , त्याच वनांत जावालि नांवाचे महर्षि राहत होते. त्यांचा पुत्र हारीत हा शिप्यांसह त्या मार्गानें स्नानास चालला होता. सत्पुरुषांचीं मनें कारण नसतांहि दयार्द्र असतात ! माझी तशी अवस्था पाहून हारीतऋषीस दया येऊन तो ह्मणाला ' अरे, हें राघूचें पिलू येथे पडले आहे, याला आपली मान देखील सावरून धरतां येत नाहीं. तर याच्यांत थोडी धुगधुगी आहे तोपर्यंत यास पाण्याजवळ तरी घेऊन जाऊं ! असें बोलून त्याने मला सरोवराजवळ नेलं. माझी हालचाल त्याच्या दृष्टीस न पडल्यामुळे तो फारच घाबरा झाला व त्याने उदकाचे थोडे थेंब माझ्या तोंडांत सोडले ! त्यामुळे मी सावध झालों, तेव्हां त्यास बरे वाटले. मग त्याने मला थंड छायेंत ठेविलें व आपण स्नानास गेला. सर्व कर्मे आटोपल्यावर तो मला घेऊन तपोवनाकडे गेला. तथें एक रमणीय आश्रम माझ्या दृष्टीस पडला. त्या आश्रमासभोंवतीं पुष्कळ फळझाडें व फुलझाडें होतीं. आश्रमांत व बाहेर