या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १५१ सो. मं. पं. वाचनाऊ, " पुसून तो ह्मणाला. “ प्रिये तूं कशाकरतां शोक करितेस ? मजकडून किंवा कोणाकडून कांहीं अपराध झाला असल्यास सांग. फार काय, हे माझे जीवित तुझ्या हाती आहे! " असें राजाचें भाषण ऐकून मकरिका नांवाची दासी ह्मणाली, “ महाराज, आपणाकडून किंवा दुसरे कोणाकडून राणी- साहेबांचा अपराध कोठून होणार? या दुःखाचें कारण असे आहे की, इतके दिवस झाले तरी आपणांस संतति नाहीं, तेव्हां आपलें जीवित व्यर्थ आहे, असें त्यांना वाटतें आहे ! आज महाशिवरात्रीचा दिवस असल्यामुळे राणी- साहेब महाकालाच्या दर्शनाकरितां गेल्या होत्या. तेथें महाभारत चाललें होतें त्यांत असें निघालें कीं, 'ज्याला पुत्र नाहीं त्याला उत्तम गति नाही !' हें ऐकल्यापासून तर त्या फारच कष्टी झाल्या आहेत. आह्मीं किती जरी त्यांची समजूत केली तरी त्या खात नाहींत, पीत नाहीत व कांही विचारलें तर नीट सांगत नाहींत ! " 66 अर्से तिचें भाषण ऐकून राजा फार दुःखित झाला व मोठ्यानें सुस्कारा टाकून ह्मणाला, ज्या गोष्टी आपल्या स्वाधीन नाहींत त्याला काय उपाय ? आपण किती जरी रडत बसलों तरी काय उपयोग? पुत्रसुख आपल्या नशिबीं- च नसले तर त्याला काय करावयाचें ? पूर्वजन्मीं आपण तसे पुण्य केलें नसेल ह्मणून त्याचें अर्से फळ आपणांला मिळालें ! जसें द्यावें तसे घ्यावें ! अपत्य नसल्यामुळे रात्रंदिवस मलाहि चैन पडत नाहीं. माझे जीवित व राज्य हीं मला अगदीं निष्फल वाटंत आहेत. परंतु करायाचें काय? तर प्रिये ! शोक सोडून दे, धैर्य घर, आणि दानधर्म करीत जा ! " याप्रमाणे सांगून त्यानें तिचे डोळे पुसले व तिचें सांत्वन करून तो आपल्या मंदिरां- त गेला. विलासवती ही त्या दिवसापासून देवधर्म करीत काळ घालवू लागली. पुढे एके दिवशीं पहाटेच्या वेळी विलासवतीच्या मुखांत चंद्र प्रवेश करीत आहे ! असें राजानें स्वप्नांत पाहिलें. मग ते स्वप्न त्यानें शुकनासास सांगितले. तो ह्मणाला, महाराज ! यावरून थोडक्याच दिवसांत पुत्रमुख आपल्या दृष्टीस पडणार ! मलाहि आज असे स्वप्न पडलें कीं, एक दिव्याकृति ब्राह्मण येऊन त्याने एक कमल माझ्या स्त्रीस दिलें. अशीं सुचिन्हें दृष्टीस पडली तेव्हां आपणास पुत्रप्राप्ति खचित होणार !" मग राजा विलास- वतीकडे गेला व त्यानें तिला तें स्वप्न सांगून आनंदित केलें.