या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १५२ ) व कांही दिवसांनी राणीस गर्भ राहून ती केतकीसारखी शुभ्र दिसूं लागली! राणीच्या दःसींत अति चतुर अशी कुलवर्धना नांवाची दासी होती. तिच्या दृष्टीस ती चिन्हें पडतांच ती राजाकडे गेली व मोठ्या आनंदाने तिनें त्यास ते॑ वर्तमान सांगितलें! तेव्हां राजास फारच आनंद झाला. मग तो हास्यमुद्र ने शुकनासाच्या मुखाकडे पाहूं लागला. शुकनासाने राजाचें व कुलवर्धने चें मुख प्रफुल्लित पाहूनच आपले मनांत ताडिलें. मग तो राजाजवळ गेला व स्वप्न खरें झालें ना ? असें ह्मणाला. तें ऐकून राजा हसत ह्मणाला, "कुलवर्धनेने सांगितलेलें वर्तमान खरें असेल तर स्वप्न खरेंच ह्मणावयाचें!” मग राजाने आपले अंगावरील अलंकार तिला बक्षीस दिले व तो घाईनें विलासवतीचे मंदिराकडे गेला. तें मंदिर अनेक पदार्थांनी सुरक्षित केले होतें व नवीन चुना दिल्यामुळे पांढरें शुभ्र दिसत होते. विलासवतीच्या पलंगा- भोवतीं वृद्ध व जाणत्या स्त्रिया बसल्या होत्या. राजाची स्वारी दृष्टीस पडतांच विलासवती मोठ्या प्रयासानें उठावयास लागली. तेव्हां राजा ह्मणाला, प्रिये पुरें कर, आतां उठू नको! असें ह्मणून तो त्याच पलंगावर जाऊन बसला व ह्मणाला, कुलवर्धनेने आनंदाचें 66 वर्तमान सांगितलें तें खरेंचना !" तेव्हां ती लाजून खालीं तोड घालून बसली राजा पुनःपुनः विचारूं लागला तेव्हां ती ह्मणाली, “ मला उगीच मेले वारंवार लाजवावयाचें हें काय ! " तेव्हां आपली स्त्री गरोदर आहे अशी राजाची खात्री होऊन त्यास फार आनंद झाला मग तो त्या दिवशी विलास वतीच्या मंदिरांतच राहिला. पुढे तिला डोहळे लागले ते सर्व राजानें पुरविलें व त्यामुळे तिचें अंतःकरण फारच संतुष्ट राहिले. नऊ महिने पुरे होऊन प्रसूतीची वेळ जवळ आली, तेव्हां ज्योतिषी बरोबर वेळ समजण्याच्या तयारीस लागले. पुढे उत्तम दिवशीं विलासवतीस पुत्र झाला. तेव्हां जिकडे तिकडे आनंदाची गडबड उडाली. त्यावेळी बाळबाळंतिणीच्या सुरक्षित- पणाकरितां तेथें अनेक उपाय योजले होते. राजानें मोठ्या घाईनें सूतिका- गृहांत जाऊन आपल्या प्रियेने मांडावर घेतलेल्या पुलाचें मुखकमल मोठ्या आनंदाने फार वेळ पाहिले व आपणास कृतकृत्य मानले! शुकनासासहि फार आनंद झाला. त्यानेंहि राजपुत्रास पाहून त्याचे अंगावर सार्वभौमत्वाचीं लक्षणे दिसत आहेत असे राजास सांगितले. इतक्यांत मंगल नांवाचा पुरुष त्या ठिकाणी धावत आला व राजास