या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ६ )

 ह्या त्याच्या उद्गारावरून रघुनाथपंडित हा अठरा विश्वे दारिद्रयानें पीड- लेला होता, असे कोणाच्याहि लक्षांत येण्यासारखे आहे ! अशीच प्रायः मुक्तेश्वर वगैरे इतर कवींचीहि स्थिति होय !
 दुसरें, परद्वीपस्थ इंग्लिश ग्रंथकार डॉ. जॉनसन याचे उदाहरण पहा ! हा ग्रंथकार थोरल्या ( अक्का ) बाईच्या वाटयास गेला होता ! यामुळें त्याची आई वारली तेव्हां तिचें और्ध्वदेहिक करण्यास त्याजवळ एक छदाम देखल नव्हता. तेव्हां त्यानें 'रासेलस' नांवाचा ग्रंथ करून व त्याचा हक विकून त्या द्रव्यानें आपल्या आईचा दिवस केला ! ही गोष्ट तर आधुनिक विद्वानांत प्रसिद्धच आहे. सारांश, उपजीवनाच्या मार्गे धावणें, है तर प्रायः सर्वोच्या नशीबीं लागलेच आहे. तथापि त्यांतले त्यांत चैनीत फारसा वेळ न घालवितां आळस सोडून 'बिंदुसरो' न्यायानें किंवा “ कणशः क्षण. शश्चैत्र विद्यामर्थेन साधयेत् " या वचनास अनुसरून उद्यमपरता स्वीकारली असतां कालगतीनें मोठमोठी कार्ये घडून येतात! हे तत्त्व नेहमी लक्षांत ठेवून उच्चप्रतीच्या उपयुक्त ग्रंथादिकांविषयी प्रयत्न चालू ठेवले असतां ते सिद्धीस जाणार नाहीत, असें कदापि होणार नाहीं ! असो.
 साहित्यशास्त्रांत गद्य काव्याचे आख्यायिका व कथा असे दोन भेद सांगितले आहेत.

गद्यं तु गदितं द्वेधा कथा चाख्यायिकेति च ।
कथा कत्तिांता सत्यार्थाख्यायिका मता ॥

अलंकारसंग्रह.

 बाणभट्टाचे दोन्ही ग्रंथ या दोहींची उदाहरणं होत. त्यानें स्वतः हर्ष- चरितास ' आख्यायिका ' म्हटले आहे. व कादंबरीस ' कथा' असेंहि म्हटले आहे. ते असे:--

करोम्याख्याधिकाम्भोधौ जिव्हाप्लवनचापलम्

हर्षचरित.

ढीया निबद्धेगमतिद्वयी कथा

कादंबरी

.

 अग्निपुराणांत अनेक विषयांचे निरूपण केले आहे.त्यांत आख्यायिका आणि कथा यांचीहि लक्षणे सांगितली आहेत ती अशीं: --