या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १५५ ) तले आहे की, महाराजांनी कुलूतराजास जिंकलें, तेव्हां त्याची ही कन्या बंदी केलेल्या लोकांत सांपडली. ही अनाथ समजून मीं हिचें मुलीप्रमाणे पालन पोषण केलें. ही तुझी सेवा करण्यास योग्य समजून तिला तुजकडे पाठविले आहे, तर तू हिचें चांगले संगोपन करावेंस. " असे सांगून तो गेला. त्या दिवसापासून पत्रलेखा नेहमी चंद्रापीडाच्या सेवेत तत्पर राहिलीं. पूढें कांही दिवसांनी चंद्रापीडास यवराज्याभिषेक करावा, असें राजाच्या मनांत येऊन त्यानें सेवकांस अभिषेकाची तयारी करण्यास आज्ञा केली. त्यावेळी चंद्रापीड शुकनास प्रधानाच्या भेटीस गेला असतां त्यानें त्यास उपदेश केला आहे. तो ह्मणालाः बाबा चंद्रापीडा ! तूं चांगलें शास्त्रा- ध्ययन केलें आहेस, तेव्हां तुला उपदेश करण्यासारखें कांहीं राहिले आहे असें नाहीं. तथापि मला थोडेंसें सांगणे अवश्य आहे. संपत्ति, तारुण्य, सौंदर्य आणि अधिकार यांपैकी एक देखील मनुष्यास उन्मत्त करतें ! मग सर्वच एके ठिकाणी जमल्यावर काय विचारावें ? या- करितां सावध रहा. तूं सुज्ञ आहेस, तेव्हां तुला फार सांगणे नको. तुझा पिता तुला यौवराज्याभिषेक करणार आहे, ह्या उत्सवाचा तूं अनुभव घे; राज्य- कारभार नीट चालीव व शत्रूंस नम्र कर प्रतापानें प्रकाशित होण्याचा हा तुझा समय आहे. " इत्यादि उपदेश ऐकून चंद्रापीडास आनंद वाटला व तो शुकनासास विचारून आपले मंदिरी गेला. पुढे अभिषेकाचा सुदिन प्राप्त झाला, तेव्हां सर्व तयारी झाली. राजानें अनेक पुण्यतीर्थे आणवून व तीं मंत्रपूत करवून पुत्रास यौवर राज्याभिषेक करविला. अभिषेक होतांच जशी एकादी लता एका वृक्षावरून दुसन्या वृक्षावर चढून जाते, त्याप्रमाणे तारापीडास न सोडतां राज्यलक्ष्मीनें चंद्रापीडावरहि आक्रमण केलें ! - 66 ू चंद्रापीडाची शरीरसंपत्ति अगोदरच उत्तम, त्यांत राज्यलक्ष्मीच्या कांतीनें त्यावर विशेषच शोभा दिसूं लागली ! सिंहासनावर बसल्यावर त्याने जमले- ल्या सर्व लोकांचा सन्मान करून त्यांनां संतुष्ट केले. इतक्यांत दिग्विजयास निघण्याचा चौघडा वाजूं लागला, तेव्हा चंद्रोपोड सिंहासनावरून उठला. त्यावेळी सर्वांनीं जयजयकार केला. मग चंद्रापीड राजपुत्रांसह बाहेर पडला, तथे उत्तम शृंगारलेल्या हत्तीवर पत्रलेखा अगोदरच जाऊन बसली होती, त्या हत्तिणीवर चंद्रापीड बसून नगराबाहेर गेलर चंद्रापीडाच्या