या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १५६ ) मुकुटावरील माणकांचे किरण सभोंवतीं पसरल्यामुळे जशी काय सर्व जगां- तील राजलक्ष्मी त्याजकडे येत असल्यामुळेच तिच्या पायाचा हा अलिता भूमीस लागला आहे काय असे भासत होतें ! बाहेर तर पुष्कळच मांडलिक राजे व सैनिक उभे होते. सेनापतीने सर्वांचीं नांवें सांगितल्यावर ते त्यास प्रणाम करून त्याजबरोबर चालू लागले. हाजारों हत्ती, घोडे, व पायदळ चालत असल्यामुळे हा समुद्राचा लोटच चालला आहे असें भासत होतें. वैशंपायनहि हत्तिणीवर बसून चंद्रापीडाबरोबर चालला होता. चतुरंग सैन्यानें पृथ्वी अगदीं गजबजून गेल्यामुळे आणि छत्रें, ध्वज, व भाले यांनीं आकाश व्याप्त झाल्यामुळे तेथे विलक्षण शोभा दिसत होती. धूळ तर इतकी उडाली होती की, तीमुळें सूर्यबिंब अगदीच निस्तेज दिसूं लागले! तेव्हां सैन्या- चा भार सहन न झाल्यामुळे पृथ्वी ब्रह्मदेवास शरणच जात आहे काय अर्से भासले ! मग वैशंपायन चंद्रापीडास ह्मणाला. ' ह्या अपरिमित सैन्यामुळे पृथ्वीस खरोखरच कौरव व पांडव यांच्या सैन्याची आठवण होत असेल ! ' याप्रमाणे ते बोलत चालले. पुढे उतरण्याचे ठिकाण येतांच त्या ठिकाणी सैन्यासह ते उतरले. दुसरे दिवशी चंद्रपीडाची स्वारी पुढे चालली. दररोज नवीन नवीन राजे त्यास येऊन भेटू लागल्यामुळे त्याचे सैन्य फारच वाढत चाललें. मग शत्रूंचा पराभव करीत व करभार घेत, तो पृथ्वी जिंकीत चालला. त्यानें तीन वर्षांत बहुतेक पृथ्वी जिंकली. मग आपले सैन्य फारच थकलें होतें झणून तो विश्रांतीकरिता कैलास पर्वताजवळ तळ देऊन राहिला. एके दिवशीं चंद्रापीड इंद्रायुधावर बसून मृगया करीत असतां तेथील पर्वताच्या शिखरावरून खाली उतरलेले एक किन्नरांचें जोडपे त्याच्या दृष्टीस पडलें. तेव्हां त्यास त्याचे मोठे कौतुक वाटून तो त्याचे मार्गे लागला. मग त्याचा पाठलाग करीत चालला असतां ते भिऊन पर्वतावर चढून एकाएकी दिसेनासें झालें ! तेव्हां तो इकडे तिकडे पाहू लागला तो आपण कोणीकडे आलों हैं त्यास कांहींच कळेना. मग तो आपल्याशी बोलू लागला. तो झणाला - " काय पहा मी किती वेडेपणा केला हा ! पृथ्वी जिंकिण्याचें काम पुरे न करता आपले लोक सोडून मी मृगयेच्या नादानें कोणीकडे येऊन पडलों ! येथे कोणी मनुष्य दिसत नसल्यामुळे सुवर्णपुरचा रस्ता तरी कोणास पुसावा? सुवर्णपुर हें उत्तरदेशाच्या सीमेवर आहे, याकरितां आतां