या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १५७ ) → मग तिकडे जावें हें बरें. " इतक्यांत त्याचे मनांत आले कीं, ऐन दोन प्रहर भरले असल्यामुळें ऊन फारच कडक पडलें आहे, व इंद्रायुधहि फार थकला आहे, याकरितां यास कांहीं वेळ चरूं द्यावें व पाणी पाजावें आणि आपणहि स्नान करून उदक प्राशन करावें. नंतर ऊन कमी झाले ह्मणजे परत जावें. असा विचार करून तो उदकाचा शोध करीत अच्छोदसरोवराकडे गेला. तें सरोवर फारच विस्तीर्ण असून सुगंधि व शीतल जलाने परिपूर्ण भरलें होतें. त्यांत अनेक कमले प्रफुल्लित झाली होती व त्यांवर भ्रमर गुंजारव करीत फिरत होते. अनेक वृक्ष व लता यांनी त्या सरोवराचे आसमंताद्भागचा प्रदेश अगदीं हिरवागार दिसत होता. अनेक प्रकारचे पक्षी त्या ठिकाणीं विहार करीत होते. अर्से सरोवर पाहतांच चंद्रापीडाचे सर्व श्रम दूर झाले. तो आपल्या मनांत ह्मणाला, किन्नराचे मार्गे लागल्यामुळे हे सरोवर माझ्या दृष्टीस पडलें, व त्यामुळे झालेल्या इतक्या श्रमाचे सार्थक्य झाले. ह्या सरो- वराचें उदकहि किती गोड आहे ह्मणून सांगावें ! असे अमृततुल्य उदक असतां ब्रह्मदेवानं आणखी अमृत कशाकरितां उत्पन्न केलें कोण जाणे ! मग त्या सरोवराचे दक्षिणतीरावर जाऊन त्यानें घोड्याचें खोगीर काढलें. मग घोड्यानें जमिनीवर लोळून हिरवे गवत खाल्लयावर त्यानें त्यास पाणी पाजलें; व आपणहि स्नान करून उदक प्राशन केलें. मग तो एका लतामंडपा- खाली शिलातलावर स्वस्थ पडला असतां इतक्यांत उत्तरेकडून गायनाचा सूर त्याचे कानी आला. तेव्हां अशा शून्य अरण्यांत गायनाचा सूर कोठला? ह्मणून त्यास फारच नवल वाटलें. आणि हा सूर कोट्न येतो आहे हे पहावें, या हेतूनें तो इंद्रायुधावर बसून त्या दिशेकडे चालू लागला. पुढें नादलुब्ध हरणे धावत चालली होती, त्यामुळे ती त्यास वाटच दाखवीत चाललीं आहेत की काय असे भासत होतें ! वाटेने अनेक प्रकारच्या पुष्पांचा मधुर सुवास सुटला होता. भ्रमर गुंजारव करीत फिरत होते. शीतल व सुगंध वायु वाहत असल्यामुळे मनास फार आनंद होत होता. हारीत, कोकिल, चकोर इत्यादि पक्ष्यांचे मधुर शब्द ऐकू येत होते. शेकडों राघू व वानर झाडां- वरून फळे खात बसले होते. मयूरांचे थव्यांचे थवे दृष्टीस पडत होते. अशा प्रकारची तो शोभा पहात चालला असतां एक शुभ्र देवालय त्याचे दृष्टीस पडलें. त्या ठिकाणी केतकीचीं बनें प्रफुल्लित झाली होती. त्यांतील परागाने चंद्रा- पीडाचें अंग शुभ्र झाल्यामुळे शंकराच्या दर्शनाकरितां हा भस्म लावूनच