या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १५९ ) दुष्पाप ह्मणून कांहींच नाहीं ! पहा, अचेतन वृक्ष देखील हिला फळें अर्पण करितात ! मग तीं मधुर फर्के भक्षण करून व उदक प्राशन करून तो पुनः शिळेवर जाऊन बसला. त्या कन्येनें फलाहार करून ती तेथें दुसऱ्या शिलेवर येऊन बसली. मग तो तीस ह्मणाला आपण अनुग्रह केल्यामुळें मला विचारावेंसें वाटत आहे, तर कांहीं हरकत नसेल तर आपला सर्व वृत्तांत सांगण्याची कृपा करावी. देव, ऋषि, गंधर्व यांपैकी कोणत्या कुळास भगवतीनें भूषेत केलें आहे ? तारुण्यांत अशा विरक्ततेचें कारण काय ? " असे त्याचें भाषण ऐकतांच तिच्या नेत्रावाटें अधूचे लोट वाहू लागले. तें पाहून चंद्रापीडाच्या मनांत आलें, काय कर्मभोगानें कोणासच सोडलें नाहीं ! मग ती मोठ्यानें सुस्कारा टाकून ह्मणाली, " महाराज ! मज मंद- भागिनीचें वर्तमान ऐकण्याची आपणास इच्छा आहे तर सांगतें ऐकावें :- , देवलोकीं अप्सरांची चवदा कुले आहेत. दक्षप्रजापतीच्या मुलींत मुनि व अरिष्टा अशा दोन कन्या होत्या. मुनीला चित्रसेनादि पुत्र झाल्यावर सोळावा चित्ररथ झाला. पुढे इंद्राचे व त्याचें मित्रत्व होऊन त्यास सर्व गंधर्वाधिपत्य मिळाले. त्याचे राहण्याचे ठिकाण येथून जवळच हेमकूटपर्वता- वर आहे. दुसरी कन्या अरिष्टा. हिला सात पुत्र झाले. त्यांत वडील पुत्र हंस होय. त्याला चित्ररथानें दुसन्या कुळाच्या राज्यपदी बसविलें. तोहि तेथेंच राहतो. चंद्रकुळापासून उत्पन्न झालेल्या अप्सरांच्या कुळांत गौरी नांवाची कन्या उत्पन्न झाली. तिचा हंसाने स्वीकार केला. मदनाच्या योगानें जशी रति, त्याप्रमाणें हंसाच्या योगानें ती फारच आनंद पावली. त्या थोर स्त्रीपुरुषांच्या पोटीं हजारो दुःखें भोगणारी मी एकटी करंटी कारटी उत्पन्न झालें ! माझ्या पित्यास दुसरें मूल नसल्यामुळे माझ्या जन्मकाळी त्याने मोठा उत्सव केला व माझें महाश्वेता असे नाव ठेविलें. पुढे सुख- दुःखाचें खरें स्वरूप ज्यांत समजत नाहीं असें लहानपण जाऊन तारुण्यावस्था प्राप्त झाली. नंतर वसंतऋतूच्या दिवसांत एके दिवशीं मी आपल्या आईबरोबर ह्याच अच्छोदसरोवरावर स्नानाकरितां आले. त्या वेळीं सरोवरांतील कमलें प्रफुल्लित झाल्यामुळे ह्या ठिकाणी फारच शोभा दिसत होती ! जिकडे तिकडे मोहोर आल्यामुळे आंब्याची झाडे अगदी वांकली होती. जागजागीं फुलांचे ढीग पडले होते ! अनेक सुवासिक पुष्पें प्रफुल्लित झाली होती व त्यांचे पराग