या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १६१ ) ऋषि हे वंद्य आहेत. याकरितां त्यांस वंदन केल्याखेरीज जाणें हेंहि योग्य नाहीं. मग मी पुढे होऊन त्यास नमस्कार केला. त्या वेळीं मदनाच्या अमोघ सामर्थ्यानें त्याचीहि वृत्ति चंचल झालेली दिसली ! त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले! त्याच्या हातांतील स्फटिकांची माळ थरथर कापूं लागली, व तो एकसारखा टक लावून मजकडे पाहू लागला! तेव्हां तर माझी जी अवस्था झाली ती तर सांगतां येत नाहीं. मग त्याजबरोबर त्याचा एक मित्र होता त्याजवळ मी गेले आणि त्यास नमस्कार करून ह्मणालें, महाराज! ह्या आपल्या मित्राचें नांव काय ? व याच्या कानावर पुष्पगुच्छ आहे हा कोणत्या वृक्षाचा आहे ? यांचा सुगंध फारच अप्रतिम आहे ! तो ह्मणाला, " तुला या गोष्टीचें काय करावयाचे आहे ? तथापि तुला मोठें कौतुक वाटत आहे तर सांगतों ऐक. - देवलोकी श्वेतकेतुऋषि आहेत. ते एके दिवशीं स्नान करण्याकरितां गंगेवर गेले असतां कमलवनांत राहणा- न्या लक्ष्मीने त्यांस पाहिले. त्याबरोबर तिला कामविकार होऊन एक कुमार उत्पन्न झाला. तो तिर्ने त्या ऋषीस अर्पण करून याचे पालन करावें असे झटलें. तेव्हां ऋषीनें दिव्य दृष्टीने सर्व लक्षांत आणून कमलवनांत त्याची उत्पत्ति झाल्यामुळे त्याचे पुंडरीक असे नांव ठेविलें. व त्याजकडून विद्या- भ्यास करविला. तोच हा पुंडरीक ! आतां याच्या कर्णावर जो पुष्पगुच्छ आहे तो कल्पवृक्षाचा आहे. नंतर आह्मी नंदनवनाजवळून ह्या सरोवराकडे येत असतां मार्गीत वसंतलक्ष्मीसह नंदनवनदेवता त्या ठिकाणी फिरत होती. तिर्ने हा पुष्पगुच्छ आणून माझ्या मित्रास झटले, अतिसुंदर अशा या रूपास हा पुष्पगुच्छ अनुरूप आहे; याकरितां याचा स्वीकार करावा ! अशी आपल्या रूपाची स्तुति ऐकून हा लज्जित होऊन तसाच पुढे चालला. तेव्हां मीं यास झटले, सख्या, हा पुष्पगुच्छ घेण्यास काय दोष आहे? मग मीं तिच्यापासून तो घेऊन याच्या कानावर ठेवला ! " , 66 धे याप्रमाणे आमचें बोलणं चालले असतां तो ऋषिकुमार हासून ह्मणाला, हे कौतुकवति ! तुला या पुष्पगुच्छार्चे मोठे कौतुक वाटत असेल तर हा तुला. " असे ह्मणून त्यानें तो माझ्या कानावर ठेवला. त्याचा हस्तस्पर्श होतांच माझी जी अवस्था झाली ती सांगता येत नाहीं ! माझ्या गालाच्या स्पर्शसुखानें त्याचीहि तशीच अवस्था होऊन लज्जेबरोबर त्याची रुद्राक्षमाळा- हि गळून पडत आहे तो मीं मध्येच तिला झेलून आपले गळ्यांत २१