या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६१ ) तूं हिरावून नेलेस !" अशा अर्थाच आर्या लिहिलेली होती. ती पाहून मी मदनविकाराने अधिकच वेड्यासारखी झाले. व मजपेक्षां माझी दासी तरलिका ही धन्य आहे ! असे समजून तिजबरोबर त्या ऋषिकुमाराच्या गोष्टी बोलत बसले ! V पुढें संध्याकाळच्या वेळेस माझी एक दासी येऊन मला म्हणाली, "बाईसाहेब एक ऋषिकुमार दारापाशीं येऊन उभा आहे व रुद्राक्षमाला मागण्या- करितां आलो आहे असे सांगतो आहे. " हे ऐकतांच तोच ऋषिकुमार आला ! अर्से मला वाटून मला फारच आनंद झाला व मीं त्याला लवकर घेऊन येण्यास सांगून उत्कंठेने वाट पहात बसलें ! इतक्यांत अत्यंत खिन्न झालेला त्याचा मित्र माझे दृष्टीस पडला. मग मी त्यास नमस्कार करून आसनावर बसविलें.तेव्हां तो साशंक झालेला पाहून मी प्रार्थना केली, “महाराज, आपणास जें काय बोलावयाचें असेल तें खुशाल बोलावें, मनांत शंका धरूं नये." मग तो सुस्कारा टाकून म्हणाला, काय सांगावें ! कंदमूलफलें खाऊन शांतपणानें तपश्चर्येत काळ घालावेगे कोणीकडे, आणि विषयोपभोगानें मलिन अशी कुवासना कोणीकडे ? परंतु दैवानें पहा काय विटंबना मांडिली आहे ? ती ! परंतु यास उपाय नाहीं ! मित्राचें प्राणरक्षण होण्याकरितां सांगणे भाग आहे. तूं तेथून निघून आल्यावर माझ्या मित्राची जी दुर्दशा झाली ती सांगता येत नाहीं. मी त्याला रागें भरून पाहिले, पुष्कळ उपदेश करून पाहिले, सर्व उपाय केले. परंतु त्यांचा कांहीं उपयोग झाला नाही. शेवटी कामपीडेनें त्याची प्राणांतक अवस्था पाहून तुजकडे आलों आहे. तर अशा प्रसंगास व अशा प्रेमास जें उचित तें तूं करावें. अधिक सांगण्यास मला कांहीं सुचत नाहीं ! " असें बोलून तो माझ्या तोंडाकडे पहात बसला. अर्से त्याचें भाषण ऐकून मी आनंदरसांत बुडाल्यासारखी झालें व मदनानें हा मजवर मोठाच अनुग्रह केला असें मी समजलें ! इतक्यांत एक दासी येऊन ह्मणाली " आपली प्रकृति नीट नसल्याचें समजल्यामुळे राणीसाहेब आपल्या समाचारास येत आहेत. " अर्से तिचें भाषण ऐकतांच कपिंजल उठला व माझ्या मित्राचें रक्षण कर, सूर्या- स्ताची वेळ झाली, मी आतां जातो. " असें बोलून माझ्या उत्तराची वाट न पाहतां तो गडबडीनें निघून गेला. मग माझी आई येऊन व कांहीं वेळ मजजवळ बसून माझा समाचार