या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १६४ ) घेऊन निघून गेली. ती काय बोलली तिकडे माझे मुळींच लक्ष नव्हतें. नंतर संध्याकाळ झाला तेव्हां मीं तरलिकेस झटलें. " तरलिके, माझे हृदय फारच व्याकुळ झाले आहे. तर अशा वेळेस मी काय करावें तं मला सांग तरी बाई ! कपिंजलानें काय सांगितलें तें तूं ऐकिलेसच, तर आतां मर्यादा, कुल, शील, यांकडे लक्ष देऊन येथेंच रहावें तर ऋषिवधाचें पाप माझ्या माथी बसेल, " असें बोलत आहे तो इतक्यांत चंद्रोदय झाला. त्यामुळे नवज्वरानें तप्त झालेल्यावर जसा अंगारवर्षाव, तसा मेला हा चंद्र मला वाटू लागला ! मला मूर्च्छा येऊन मी तरलिकेच्या मांडीवर पडले असतां मी मदनाच्या हातांतच सांपडलें आहे असे मला वाटलें ! माझी तशी अवस्था पाहून तरलिका फारच घाबरली. मग तिनें चंदनाची उटी तयार करून माझ्या अंगास लावली व ती ताडाच्या पंख्यानें वारा घालीत बसली. मग मी सावध झालें असें पाहून तरलिका माझ्या पायां पडून ह्मणाली, " बाईसाहेब ! आतां कोठवर लज्जा व मर्यादा धरतां ? मला आज्ञा करा ह्मण जे तुमचे वल्लभास मी घेऊन येतें. किंवा तुझीच त्याजकडे चला ! " मीं झटलें “ बाई तरलिके ! लज्जा व मर्यादा यांना नाहींसें करणारा हा मेला मदन- मित्र चंद्र मला प्रियाकडे किंवा मृत्यूकडे नेण्याकरितां आलाच आहे. तर चल बाई ! जीव आहे तोपर्यंत मजकरितां दुःख भोगणान्या प्रियजनास भेटू तरी एकदांचें !" असे बोलून मी मोठ्या कष्टानें उभी राहिलें, व जाण्यास तयार झाले. इतक्यांत माझा उजवा डोळा लंवला. तेव्हां माझ्या मनांत धस्स झाले आणि मी अधिकच घाबरलें ! मग मी बरोबर सुगंधिप्पें, तांबूल व उटीचं साहित्य घऊन तरलिके- बरोबर चाललें. माझ्या गळ्यांत रुद्राक्षमाला होती ती तशीच होती व काना- वर पुष्पगुच्छ होता तोहि तसाच होता. मी आपल्या अंगावरून तांबडे वस्त्र गुंडाळून कोणासहि दिमूं न देतां आपल्या मंदिरांतून निघून प्रमदवनाच्या दाराने बाहेर पडलें आणि झपाट्यानें चाललें तरलिकेवांचून दुसरें मजबरोबर नाहीं, असे पाहून मी आपल्या मनांत झटलें, उत्कंठने जाणाऱ्या स्त्रीस सेवकांचे कांहीं प्रयोजन लागत नाहीं ! या वेळेस दुसरेच सेवक बरोबर असत त ! जसा काय मेला मदन सज्ज होऊन मजपुढे चालतच आहे! तसाच हा मेला चंद्रहि आपल्या करानें ( हस्तानें ) कोणी "प्रिया कडे