या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १६५ ) माझा हात धरून जसा काय मला प्रियाकडे नेतच आहे ! उत्कंठा दासी ही मजबरोबर चालतच आहे, असें वाटलें ! ” मग तरलिकेबरोबर बोलत त्या स्थळाजवळ गेलें, तों दुरून रोदनाचा स्वर माझ्या कानी पडला. पूर्वी माझा डोळा लवला होताच; त्यामुळे माझ्या पोटांत अधिकच घडकी भरली. तशीच लगबगीनें पुढे गेलें तो रोदनयुक्त करुणस्वर माझे कानी पडला. तो असा- मी सर्वस्वी हाय हाय ! बुडालों ! अरे दुरात्म्या मदनपिशाचा ! हें काय तू केले ? अगे दुष्टे महाश्वेते ! अर्से यानें तुझें काय केलें होतें ? अरे दुष्टा चंद्रा ! तूं आतां कृतार्थ झालास ! अरे सख्या पुंडरीका ! माझी वाट तरी पहा ! आतां तुझें मजविषयींचें प्रेम कोठें गेलें ? " अशा प्रकारचा कपिंजलाचा विलाप भाझ्या कानी पडला. - 66 तो ऐकून माझ्या जिवांत जीव नाहींसा होऊन मीं मोठ्यानें किंकाळी फोडली. मग जसें काय कोणीं मला उचलूनच नेत आहे, अशा रीतीनें मी घावत धावत त्या ठिकाणी गेलें. तो त्या ठिकाणी पुष्पशय्येवर निश्चेष्ट पडलेला पुंडरीक माझ्या पापिणीच्या दृष्टीस पडला ! . त्या वेळी माझ्या डोळ्यापुढे अंधारी येऊन पाताळांत पडल्यासारखें मला झालें ! आणि मी आले कोणीकडे हें आहे काय ? हें मला कांहीच समजेनार्से झालें. माझे प्राण त्या वेळेसच निघून जावे, परंतु तसें कोठून होणार ! पुढे कांहीं वेळानें मूर्छा गेल्यावर अमीत पडल्यासारखें मला झाले. माझा प्रिय गेला आणि मी कशी जीवंत राहिलें ? हा नाथा मला एकटीला टाकून तुझी कसे गेलां ! ह्या तरलिकेला पुसून पहा बरें ! एकच दिवस पण सहस्रयुगांसारखा मी घालविला ! तर प्रसन्न व्हा, आणि एकवेळ तरी मजशी बोलून माझे मनोरथ परिपूर्ण करा. मी तुमच्यावर अनुरक्त झालेली अनाथ दासी आहे, याकरितां मजवर दया करा ! हाय हाय मी मंदभागिनी सर्वस्वी बुडालें ! याप्रमाणे भूतसंचार झाल्यासारखी होऊन मीं पुष्कळ विलाप केला. माझ्या डोळ्यावाटें पाण्याचे लोट चालल्या. मुळे माझेंच पाणी होतें कीं काय असे मला वाटले. मग पुंडरीकाच्या शरीरा- स हालवून झणाले, 'नाथा तुली मोठे निर्दय आहां हो ! इतका मी शोक करीत आहे तरी तुझांस माझी कांहींच कशी दया येत नाहीं ? ' त्याच्या गळ्यांत मोत्याची माळ पाहून मी झटलें, 'कायगें मुक्तावलि ! तूं मोठी