या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १६७ ) प्रातःकाल झाला, तेव्हां येथेंच तप करीत काळ घालवावा, असा विचार मनांत आला. मग आईबाप आप्तमित्र या सर्वांचा त्याग करून येथेंच शंकराची आराधना करीत राहिलें. दुसरे दिवशी माझे आईबाप माझा शोध करीत येथें आले व त्यांनी मीं घरी चलावे ह्मणून पराकाष्ठा केली. कांहीं दिवस ते येथे राहिले व शेवटीं निराश होऊन परत गेले. " इतकें बोलून ती पुन: खिन्न होऊन बसली. मग तो ह्मणाला, जी स्वाधीनची गोष्ट नाही तिला काय करावयाचें ? आपण आपल्या प्रियाकरितां आप्तमित्र, सर्व ऐश्वर्य व सुख, यांचाहि त्याग केला, हें काय थोडें झालें ? दुःख सहन होत नाहीं ह्मणून प्राणत्याग करणे हें कांहीं उचित नाहीं. आशानें कांही धर्म होत नाही, किंवा प्रिय आप्तांची भेट होत नाहीं. आत्मघात करण्याचे पातकानें मात्र तो प्राणी बद्ध होतो. जिवंत राहिल्यानें मृताच्या उद्देशानें जलांजलि, पिंडदान वगैरे सत्क तरी घडतात. पहा, शंकरानें मदन दग्ध केला असतां रतीनें प्राणत्याग केला नाही. पांडुराजाची स्त्री कुंती हिनेंहि प्राणत्याग केला नाहीं. अभिमन्यूची स्त्री उत्तरा हिनेंहि तसें कलें नाहीं. अशी अनेक उदाहरणे आहेत. त्यांत आपणास प्रिय समागमाची आशा मुळींच नाहीं, असें नाहीं. त्या दिव्यपुरुषास उगीच मिथ्या बोलण्याचे काय कारण ? " इत्यादि बोलून चांद्रपीडानें महा श्वेतेचें सांत्वन केलें ! संध्याकाळ झाला तेव्हां महाश्वेता जपादि कर्मे करण्यास गेली. चंद्रा- पीडहि संध्योपासनादि कर्मे करण्यास झन्यावर गेला. कांहीं वेळाने पुन्हां ते दोघे आपापल्या जाग्यावर येऊन बसले. 66 महाश्वेतेच्या वृत्तांतावरून चंद्रापडाच्या मनांत आलें कीं, मदन मोठा दुर्धर आहे. त्याच्या तडाक्यांत सांपडलेले थोर थोर देखील जिवास मुकतात ! मग तो महाश्वेतेस ह्मणाला, " आपल्या दुःखाची भागीदारीण तरलिका कोठे आहे ? " ती ह्मणाली, "महाराज! चित्ररथगंधर्वाविषयीं मागें मी सांगितलेंच आहे. त्या चित्ररथाची स्त्री मदिरा होय. त्या दोघांनां अतिसुंदर अशी एक कन्या आहे. तिचें नांव कादंबरी. ती आपल्या आई- बापांची व सर्व गंधवची फार लाडकी आहे. लहानपणापासून माझे तिजवर व तिचें मजवर फार प्रेम आहे ! आह्मां दोघींनां एकमेकीवांचून क्षणभर देखील करमत नसे. पुढें माझें असें दुःखकारक वर्तमान कादंबरीस समजतांच