या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १६८ ) तिर्ने निश्चय केला की महाश्वेता दुःखी आहे तोपर्यंत मला विवाह कराव याचा नाहीं, माझा पिता बळेच मला कोणास देईल तर मी आपला जीव ठेवणार नाहीं ! " हा कन्येचा निश्चय ऐकून आईबापांस मोठीच काळजी पडली. मग त्यांनी मला निरोप पाठविला की, “ महा चेते ! तुझ्या दुःखानें आह्मी अगोदरच दुःखी आहों, आणि त्यांत आणखी दुसरें असें संकट प्राप्त झाले आहे. याकरितां तूं कसेंहि करून कादंबरीची समजूत घालून आह्मांस या संकटांतून सोडीव. " नंतर मी तरलिकेस कादंबरीकडे पाठविले आणि असा निरोप पाठविला की, ' प्रियसखि ! दुःखित असलेल्या पितरांस तूं कां आणखी दुःख देतेस? मी जीवंत रहावें अशी तुझी इच्छा असेल तर वडिलां च्या अज्ञेप्रमाणे वाग. "" इतक्यांत चंद्रोदय झाला, तेव्हां महाश्वेता आपल्या शय्येवर जाऊन पडली. चंद्रापीडहि आपल्या ठिकाणी चकित होऊन राहिला. पुढे पहाट झाली. मग महाश्वेता उठून नित्यकर्म करीत बसली होती, तो गंधर्वकुमार केयुरक यासह तरलिका परत आली. तीस पाहून महाश्वेता ह्मणाली, " तरलिके, कादंबरी खुशाल आहे ना? माझा निरोप तिला सांगि- तलाना ? " ती ह्मणाली, त्या खुशाल आहेत व निरोपहि सांगितला. परंतु त्यांनी तुह्मांस उट निरोप सांगितला आहे, तो हा केयुग्क सांगेल. " मग तो ह्मणाला " देवि कादंवरीची अशी विनंति आहे कीं, हा जो निरोप पाठविला तो वडिलांचें मन राखण्यांकरितां, कां माझी परीक्षा पाहण्याकरितां आहे? तूंच पहा, आपलीं माणसे दुःखी असल्यावर मग सुखाचे प्रकार कोठून सुचणार? याकरितां फिरून असा निरोप पाठवूं नको. तूं एकटी वनांत आहेस असे नाही, तर माझे पंचप्राणहि तुजबरोबरच आहेत!" असे बोलून तो उगाच बसला. मग ती त्यास ह्मणाली " तूं आतां जा, मी स्वतःच तिच्या भेटीकरितां येणार आहे. तो गेल्यावर ती चंद्रापीडास ह्मणाली, "महाराज, मी आतां कादंबरीकडे जात आहे, तर आपणहि मजबरोबर चलावें, अशी माझी इच्छा आहे. आपण मजबरोबर आला असतां अत्यंत रमणीय असा गंधर्वलोक आपल्या पाहण्यांत येईल, व माझ्या कादंबरीची सहज भेट होईल. तर आपणांस जर श्रम वाटत नसतील, किंवा काही मोठें कार्य नसेल तर माझ्या ह्मणण्यास मान द्यावा. ' १ , चंद्रापीडानें तिचें ह्मणणे मान्य करून तो तिजबरोबर हेमकूटपर्वताची