या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १७० ) माझ्या सांगण्याची सत्यता तुलाहि कळून येईल. तर अशा पुरुषाचें दर्शन झाले असतां उगीच लाज धरून बसूं नकोस! परकीयपणा सोडून याच्याशीं मोकळेपणाने वाग. " मग कादंबरीनें सलज्ज होऊन चंद्रापीडाचे स्वागत केलें. तो सिंहासनावर बसला. महाश्वेसेसह कादंबरी आपल्या पलंगावर बसली, मग दोघींची कांहीं वेळ भाषणे झाली. तेव्हां महाश्वेतेविषयीं आप- ल्यास फारच दुःख होत असल्याचें कादंबरीनें दर्शविलें. कांहीं वेळ गेल्या. वर महाश्वेता सणाली. "प्रियसखी, अगोदर आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा आदरसत्कार केला पाहिजे, याकरिता पाहुण्यास तांबूल दे. " तेव्हां ती लाजून ह्मणाली, “ माझा यांच्याशीं परिचय नसल्यामुळे मला लाज वाटते. " मग महाश्वेतेनें आग्रहानें तिजकडून त्यास तांबूल देवविला. त्यावेळी तिच्या अंगास धर्म व कंप सुटला व विडा देतांना जसें कांहीं तिनें आपले जीवितच त्याचे स्वाधीन केलें ! इतक्यांत एक सेवक येऊन महाश्वेतेस ह्मणाला, “ देव चित्ररथ व देवी मदिरा यांनी आपणास भेटीकरितां बोलाविलें आहे. " जातांना ती कादंबरीस झणाली, " पाहुण्यानें कोठें राहावें याची तजवीज अगोदर कर. ती झणाली, " त्यांना जेथें बरे वाटेल तेथें त्यांनीं रहावें. " महाश्वेता झणाली, " क्रीडापर्वतावरील आरसेमहालांत त्यांनां राहण्यास सांगावें, " मग केयूरकानें दाखविलेल्या मार्गानें चंद्रापीड तिकडे गेला. त्या ठिकाणीं करमणूकीकरितां कादंबरीनें गायनकला जाणणाऱ्या गंधर्वकन्या पाठविल्या. व ती आपल्या शय्येवर जाऊन सचिंत पडली. कांही वेळाने ती शुद्धीवर आल्यासारखी होऊन आपल्याशीं ह्मणाली, "कुल, शील, मर्यादा, या सर्वांचा विचार न करता है मी काय केले? परक्याकडे मीं आपल्या मनाची प्रवृत्ति अशी कशी केली ! महाश्वेता व सख्या ह्या तरी मला काय ह्मणत असतील ? महाश्वेतेचें दुःख पाहून मीं तशी प्रतिज्ञा केली ! केयूरकाबरोबर तसाच निरोप पाठविला आणि हें मीं काय केले? त्याचें मन मजवर कितपत आहे याची तरी पुरी परीक्षा मीं केली? ज्याला कधीं पाहिलें नाहीं, व ज्याचें नांव सुद्धां ऐकिलें नाहीं, त्या चंद्रापीडाला मजसमोर कोणी आणिलें? देवानें, कां मेल्या मदनानें, कां माझ्या पूर्व पातकानें? त्याचे दर्शन होण्याचाच मेला उशीर की त्याबरोबर जस काय मेल्या मदनानें, मला