या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १७२ ) प्राण आपणास अर्पण करीत आहे व तसे केल्याबद्दल तिला पश्चात्ताप होणार नाहीं अशी आशा बाळगीत आहे ! " असें बोलून तिने तो हार त्याचे गळ्यांत घातला ! चंद्रापीड सानंद होऊन मणालाः " मदलेखे ! तूं मोठी चतुर आहेस | दुसऱ्याकडून एखादी वस्तु कशी घेववावी हें चातुर्य तुझ्यांत फारच आहे ! प्रेमळ व उदारांतःकरणाच्या कादंबरीचा अनुग्रह कोणास वश करणार नाहीं ? " अशा प्रकारें कांहीं वेळ बोलून त्यानें तीस निरोप दिला. पुढे सूर्यास्त होऊन रात्र पडली. नंतर चंद्रोदय होऊन जिकडे तिकडे प्रकाश पडला. तेव्हां केयूरकानें येऊन सांगितले की, " महाश्वेतेच्या आज्ञेवरून देवी कादंबरी आपल्या भेटीस आली आहे. " तेव्हां चंद्रापीड उठून उभा राहिला व पाहूं लागला तो शुभ्र वस्त्र परिधान केलेली, मौक्तिक हार घातलेली व चंदनाची उटी लावलेली अशी चंद्रोदयदेवताच येत आहे असे त्यास 'भासले ! मग मदलेखेसहित ती त्या ठिकाणी येऊन कांहीं अंतरावर नम्रतेनें बसली. त्याप्रमाणे चंद्रापीडहि मर्यादेने तिच्याजवळ बसला. मग चंद्रापीड ह्मणाला, " केवळ अवलोकनाने आपणास धन्य मानणारा असा हा जन असतां त्याजवर एवढा अनुग्रह कशाला पाहिजे होता ? आपल्या प्रमानें बद्ध झालेला हा देह आतां आपल्या स्वाधीन नाहीं ! असे भाषण झाल्यानंतर मदलेखेनें उज्जयनीकडील कांहीं विचापूस केली. मग कांहीं वेळ थोडेंसें बोलणे झाल्यावर बराच वेळ झाल्यामुळे संकोचानें कादंबरी ..तेथून उठून आपल्या मंदिरी गेली. 4. इकडे चंद्रापीडहि शय्येवर चिंतन करीत पडला. त्यास कशी ती झोंप आली नाहीं व शेवटी रात्र जाऊन प्रातःकाल झाला. मग चंद्रापीड उठला व नित्य कर्मों केल्यावर महाश्वेतेस व कादंबरीस विचारून जावें, असा विचार करून केयूरकासह तो त्यांजकडे गेला. तेथें आसनावर बसल्यावर चंद्रापीडाची परत जावयाची इच्छा व कादंबरीविषयीं प्रीति हीं लक्षांत आणून महाश्वेता कादंबरीस झणाली, " प्रियसखि, यांनां परत गेले पाहिजे. त्यांजवरोबरचे लोक त्यांचा शोध करीत हिंडत असतील, याकरितां यांस अनुमोदन द्यावे. तुम्ही दूर होत आहां तरी चंद्र व कुमुदिनी यांप्रमाणे तुमचे एकमेकांवर सदोदित प्रेम राहो ! " 66 , मग चंद्रापीड तेथून जावयास निघाला तेव्हां कादंबरी आपल्या -